शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

7 लाख रुपयांनी स्वस्त झाले कॅन्सरचे औषध; केंद्र सरकारने कस्‍टम ड्यूटी रद्द केली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 7:32 PM

केंद्र सरकारने दुर्मिळ आजारांच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधे आणि खाद्यपदार्थांवरील आयात शुल्क रद्द केला आहे.

नवी दिल्ली:केंद्र सरकारने दुर्मिळ आजारांच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधे आणि खाद्यपदार्थांवरील आयात शुल्क रद्द केला आहे. वैयक्तिक वापरासाठी आयात केलेल्या विशेष वैद्यकीय औषधे आणि खाद्यपदार्थांवर ही सूट उपलब्ध असेल. 1 एप्रिल 2023 पासून आयात शुल्क सूट लागू होईल. सरकारने विविध प्रकारच्या कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या पेम्ब्रोलिझुमाबलाही सीमा शुल्कातून सूट दिली आहे. औषधांवर साधारणपणे 10 टक्के सीमा शुल्क आकारले जाते, तर जीवनरक्षक औषधांच्या काही श्रेणींवर 5 टक्के सीमा शुल्क आकारले जाते.

काँग्रेस नेते शशी थरुर यांनी काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून दुर्मिळ कर्करोगाने पीडित मुलीच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या आयात औषधावर सीमाशुल्कातून सूट देण्याचे आवाहन केले होते. निहारिका नावाच्या या मुलीच्या उपचारासाठी 65 लाख रुपयांच्या इंजेक्शनची गरज होती. त्यावर सुमारे 7 लाख रुपये कर आकारला जात होता. मुलीचे पालक हा कर भरण्यास असमर्थ ठरल्याने त्यांनी थरुर यांना आपली समस्या सांगितली. आता सरकारने सर्व दुर्मिळ आजारांच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या सर्व औषधांवरील आयात शुल्क रद्द करुन जनतेला मोठा दिलासा दिला आहे. सरकारच्या या पावलामुळे निहारिकाच्या कर्करोगावरील उपचारासाठीचे इंजेक्शनही 7 लाख रुपयांनी स्वस्त झाले आहे.

आजार सूचीबद्ध असावाकेंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की, जर एखाद्याने काही दुर्मिळ आजारांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे वैयक्तिकरित्या आयात केली तर त्याला सीमा शुल्क भरावे लागणार नाही. हा रोग दुर्मिळ आजारांसाठी राष्ट्रीय धोरण 2021 अंतर्गत सूचीबद्ध असायला हवा.

प्रमाणपत्र द्यावे लागेलया सवलतीचा लाभ घेण्यासाठी, वैयक्तिक आयातदाराला केंद्र किंवा राज्य संचालक आरोग्य सेवा किंवा जिल्ह्याचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी/सिव्हिल सर्जन यांनी जारी केलेले प्रमाणपत्र सादर करावे लागेल, ज्यामध्ये हा आजार दुर्मिळ आजारांतर्गत येत असल्याचे प्रमाणित करावे लागेल. विशेष म्हणजे, स्पायनल मस्कुलर ऍट्रोफी किंवा ड्यूचेन मस्क्यूलर डिस्ट्रॉफीच्या उपचारांसाठी लागणाऱ्या औषधांना सीमाशुल्क सूट आधीच देण्यात आली आहे.

टॅग्स :cancerकर्करोगCentral Governmentकेंद्र सरकारIndiaभारतhospitalहॉस्पिटल