शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

वयाच्या ५३ वर्षी आईचं जडलं प्रेम, दुसऱ्यांदा केलं लग्न; भावूक झालेल्या मुलानं शेअर केला फोटो अन् सांगितली आईच्या जिद्दीची कहाणी...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 7:47 PM

Son Emotional post on Mother Remarriage: एका मुलानं आपल्या ५३ वर्षीय आईसाठी एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. महिलेनं वयाच्या ४४ व्या वर्षी आपल्या पतीला २०१३ साली गमावलं होतं.

Son Emotional post on Mother Remarriage: एका मुलानं आपल्या ५३ वर्षीय आईसाठी एक भावूक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. महिलेनं वयाच्या ४४ व्या वर्षी आपल्या पतीला २०१३ साली गमावलं होतं. त्यानंतर तिला कॅन्सर आणि कोरोनाचीही लागण झाली होती. मुलगा परदेशात राहत होता आणि ती भारतात एकटी पडली होती. असंख्य अडचणींचा सामना केल्यानंतर महिलेनं जिद्द सोडली नाही. गेल्या वर्षी याच महिलेचं एका व्यक्तीवर प्रेम जडलं आणि लग्नही केलं. 

जिमीत गांधी नावाच्या तरुणाच्या आईची ही प्रेरणादायी कहाणी आहे. त्यानं आपल्या सोशल मीडिया हँडलवर आपल्या आईसाठी भावूक पोस्ट लिहीली आहे. त्यानं आपल्या आईचा उल्लेख 'फायटर' आणि 'वॉरियर' असा केला आहे. जिमीतच्या आईनं कॅन्सर आणि डिप्रेशनसारख्या आजारांचा मोठ्या हिमतीचं समाना केला आहे. जिमीतनं लिंक्डिनवर एक भावूक पोस्ट शेअर करत संपूर्ण माहिती दिली आहे आणि त्याच्या पोस्टवर लाइक्सचा पाऊस पडत आहे. Linkedin प्रोफाइलवरील माहितीनुसार जिमीत गांधी Refinitive नावाच्या कंपनीत Sales and Account Management पदावर कार्यरत असून तो दुबईत स्थायिक आहे. 

पोस्टमध्ये काय म्हटलंय?"तिनं २०१३ साली आपल्या पतीला गमावलं. त्यावेळी आईचं वय ४४ वर्ष होतं. २०१९ साली तिला स्टेज-३ ब्रेस्ट कॅन्सर झाला. त्यानंतर दोन वर्ष तिनं केमोथेरेपी घेतली. कॅन्सरवरही तिनं मात केली. कॅन्सरवर उपचार घेत असताना तिला कोरोनाची लागण झाली. यात ती नैराश्यात गेली. नैराश्य आणि कोरोना या दोघांचा तिनं सामना केला. पण हार अजिबात मानली नाही. वयाच्या ५२ व्या वर्षी ती पुन्हा एकदा प्रेमात पडली. तिनं लग्न केलं. ती एक फायटर आहे आणि माझी आई आहे", असं जिमीत गांधीनं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

१४ फेब्रुवारीला केलं लग्नजिमीननं आपल्या पोस्टमध्ये पुढे असंही म्हटलं की माझ्या पीढीतील जितके लोक आहेत आणि त्यांचे आई-वडील सिंगल असतील तर त्यांची मदत करा. जर ते एखाद्या साथीदाराची निवड करत असतील तर त्यांना पाठिंबा द्या आणि कोणत्याही प्रकारचा संकोच मनात बाळगू नका. जिमीतनं सांगितलं की, त्याच्या आईनं सुरुवातीला तिच्या रिलेशनशीपबाबत सांगण्यास संकोच बाळगला होता. पण ही गोष्ट आईनं माझ्या पत्नीला सांगितली. त्यानंतर पुढील गोष्टी अधिक सोप्या होत गेल्या आणि आईनं १४ फेब्रुवारी रोजी लग्न केलं. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीSocial Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके