शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

उमेदवार लादणार नाही : भाई जगताप

By admin | Published: August 24, 2016 11:17 PM

कॉँग्रेस बैठक : जिल्हा परिषद- पंचायत समित्यांसाठी कार्यकर्त्याला महत्त्व

कॉँग्रेस बैठक : जिल्हा परिषद- पंचायत समित्यांसाठी कार्यकर्त्याला महत्त्वनाशिक : येत्या जानेवारी-फेबु्रवारी २०१७ मध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत पक्षाचे काम करणार्‍या कार्यकर्त्याला केंद्रस्थानी ठेवूनच उमेदवारी दिली जाईल. कोणताही उमेदवार स्थानिकांवर लादला जाणार नाही, असे प्रतिपादन कॉँग्रेसचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक आमदार भाई जगताप यांनी केले.जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या वतीने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीच्या आढावा बैठकीत आमदार जगताप यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कॉँग्रेस भवनात आमदार भाई जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होेते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पक्षनिरीक्षक डी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अहेर, महिला जिल्हाध्यक्ष डॉ. ममता पाटील, निवृत्ती डावरे, श्याम तायडे, भाऊसाहेब बोरस्ते, सुनील आव्हाड, भास्करराव बनकर आदि उपस्थित होते. आमदार भाई जगताप यांनी पुढे सांगितले की, पक्षाच्या घटनेतील बदलानुसार राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात एकाच वेळी निरीक्षक पाठविण्याचा निर्णय प्रदेश कॉँग्रेसने घेतला. जिल्‘ातील १५ मतदारसंघात पक्ष निरीक्षकांच्या नियुक्त्या झाल्या असून, ते ते निरीक्षक त्या त्या मतदारसंघात किमान दहा दिवस राहतील. त्यांच्या कामकाजावर पक्षाची करडी नजर राहील. निरीक्षकांनी त्या त्या तालुक्यात बूथ कमिट्यांपासून काम उभे करायचे आहे. पक्षाचे उमेदवारदेखील नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय पॅनलकडून अंतिम केले जातील. पक्षाकडून त्या त्या मतदारसंघात कोणताही उमेदवार वरून लादला जाणार नाही. प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी राष्ट्रवादीने पक्षाचे नुकसान केल्याचे सांगितले. मात्र आगामी निवडणुकांमध्ये युतीला शह देण्यासाठी काही ठिकाणी आघाडी करण्याची गरज असल्याचे सांगितले. बैठकीस जि. प. सदस्य प्रा. अनिल पाटील, माजी उपाध्यक्ष दिगंबर गिते, निर्मला खर्डे, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)इन्फो..अनेकांनी फिरविली पाठबैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आढावा घेतला जाणार असल्याचे माहीत असूनही अनेक आजी-माजी आमदार-खासदारांनी बैठकीकडे पाठ फिरविली. तसेच जिल्हा परिषदेच्या १४ सदस्यांपैकी एकट्या अनिल पाटील यांनी हजेरी लावली. सभेची गर्दी पाहून ही गर्दी वाढली पाहिजे, असे आमदार भाई जगताप यांना सांगावे लागले.फोटो कॅप्शन-२४ पीएचअेयू-६१ - आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस कमिटीत आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार भाई जगताप. समवेत कॉँग्रेसचे पदाधिकारी.