अहमदाबाद - उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी ‘लडकी हूँ, लढ सकती हूँ’चा नारा दिला होता. यावेळी काँग्रेसने ४०३ पैकी तब्बल १६० जागांवर महिला उमेदवार उभे केले होते. काँग्रेसच्या या योजनेमुळे इतर पक्षही महिला उमेदवार देतील, असे वाटत असताना असे घडले नाही. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये या विधानसभा निवडणुकीतही महिला उमेदवारांना तितके स्थान देण्यात आलेले नाही.
गुजरातमध्ये १८२ सदस्यसंख्या असलेल्या विधानसभा जागांसाठी काँग्रेसने केवळ १४ महिला उमेदवारांना संधी दिली आहे. उत्तर प्रदेशच्या ४० टक्के तिकिटांच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ४० टक्के आहे.
भाजपनेही गुजरातमध्ये केवळ १५ महिलांना निवडणुकीत उतरवले आहे. हिमाचल प्रदेशमध्येही चांगली म्हणावी अशी स्थिती नाही. तेथे ६८ विधानसभा जागांसाठी काँग्रेसने तीन आणि भाजपने ६ महिलांना तिकीट दिले आहे.
५% महिला आमदारही सभागृहात नाहीत -गुजरातमध्ये १३ निवडणुकांत २३०९ आमदार निवडले. यामध्ये १११ महिला सभागृहापर्यंत पोहोचू शकल्या. हे प्रमाण ५ टक्केपेक्षाही कमी आहे.