Punjab Election Results 2022 : "पक्षनेतृत्व कधीही शिकणार नाही," पंजाब निवडणुकांच्या निकालानंतर अमरिंदर सिंग यांचा काँग्रेसवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 09:13 AM2022-03-12T09:13:42+5:302022-03-12T09:14:18+5:30

Punjab Election Results 2022 : पंजाबच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा झटका लागला आहे. यापूर्वी काँग्रेसनं माजी मुख्यमंत्री कॅप्ट. अमरिंदर सिंग यांच्यावर साधला होता निशाणा.

capt amarinder singh on punjab election result congress allegation says party leadership never learn from defeat sonia gandhi rahul gandhi | Punjab Election Results 2022 : "पक्षनेतृत्व कधीही शिकणार नाही," पंजाब निवडणुकांच्या निकालानंतर अमरिंदर सिंग यांचा काँग्रेसवर पलटवार

Punjab Election Results 2022 : "पक्षनेतृत्व कधीही शिकणार नाही," पंजाब निवडणुकांच्या निकालानंतर अमरिंदर सिंग यांचा काँग्रेसवर पलटवार

googlenewsNext

Punjab Election Results 2022 : पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल नुकतेच लागले. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये पंजाब वगळता सर्व राज्यांमध्ये भाजपनं मुसंडी मारली. तर दुसरीकडे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला (Aam Admi Party) बहुमत मिळालं आहे. पंजाबमध्ये यावेळी अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये एक नाव पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचंही नाव आहे. त्यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेसलाही या निवडणुकीत चांगली कामगिरी करता आली नाही. याशिवाय त्यांनी साडेचार वर्षांच्या कालावधीत केलेल्या आरोपांमुळे पक्षाला नुकसान झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. परंतु आता अमरिंदर सिंग यांनीदेखील याला प्रत्युत्तर दिलं असून पक्ष नेतृत्व यातून कधीही शिकणार नसल्याचं म्हणत निशाणा साधला.

गेल्या वर्षी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात आलं होतं. त्यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर त्यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपुरात पक्षाच्या पराभवासाठी कोण जबाबदार आहे असा सवालही केला. "काँग्रेसचं नेतृत्व कधीही शिकणार नाही. उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या लाजीरवाण्या पराभवासाठी कोण जबाबदार आहे. मणिपुर, गोवा, उत्तराखंडबाबत काय? उत्तर एकदम स्पष्ट आहे. परंतु नेहमीप्रमाणेच ते समजणार नाहीत," असं ट्वीट अमरिंदर सिंग यांनी केलं.

सुरजेवाला यांनी केली होती टीका
"पंजाबमध्ये काँग्रेसनं एका सामान्य पार्श्वभूमी असलेल्या चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री बनवलं होतं. परंतु अमरिंदर सिंग यांच्या जवळपास साडेचार वर्षांच्या कार्यकाळात जी सत्ता विरोधी लाट होती, त्यानं पक्षाला नुकसान झालं. पंजाबमध्ये लोकांनी बदलासाठी मतदान केलं आणि विजेत्यांना शुभेच्छा देतो. आम्ही उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपुर आणि गोव्यात चांगल्या निवडणुका लढल्या. परंतु आम्ही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. यातून आम्हाला शिकायला हवंय आणि आणखी मेहनत करायला हवी," असं काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला म्हणाले.

Web Title: capt amarinder singh on punjab election result congress allegation says party leadership never learn from defeat sonia gandhi rahul gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.