नवी दिल्ली - पठाणकोट येथील मामूल छावणीतील रुद्रा हेलिकॉप्टर रणजीत सागर डॅममध्ये कोसळून झालेल्या अपघाताला २० दिवस उलटले तरी त्यात असलेल्या कॅप्टन जयंत जोशी यांचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. (Pathankot helicopter crash)त्यामुळे निराश झालेल्या त्यांच्या कुटुंबाने लष्कर आणि नौदलाची शोधमोहीम आणि रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कॅप्टन जयंत जोशी यांचे वडील हरीश जोशी यांनी सांगितले की, गेल्या २० दिवसांमध्ये माझ्यातील आत्मविश्वास संपुष्टात आला आहे. अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धनीने शोध घेतल्याने माझ्या मुलाचे पार्थिव पाण्यामध्ये कुसत आहे. (Capt. Joshi's body not found 20 days after helicopter crash, father raises serious questions)
पठाणकोटमधील मामून छावणीमधून ३ऑगस्ट रोजी उड्डाण केलेले हेलिकॉप्टर रंजित सागर डॅम लेकमध्ये कोसळसले होते. तेव्हापासून पायलट आणि को पायलट लेफ्टिनंट कर्न अभित सिंह बाथ आणि कॅप्टन जयंत जोशी बेपत्ता झाले होते. हे अपघातग्रस्त हेलिकॉप्टर पाण्यामध्ये सुमारे ८० मीटर आत गेले होते.
दरम्यान, अमृतसरमधील रहिवासी असलेल्या लेफ्टिनंट कर्नल बाथ यांचे पार्थिव १५ ऑगस्ट रोजी जलाशयात सापडले होते. मात्र कॅप्टन जयंत जोश यांच्या मृतदेहाबाबत काहीच माहिती अद्याप हाती लागलेली नाही. कॅप्टन जोशींचे वडील हरीश जोशी यांनी सांगितले की, त्यांची पत्नी मिलिट्री नर्सिंग सर्व्हिसमध्ये सेवेत आहे. तिने तिचा मुलगा राष्ट्राला समर्पित केला आहे.
दरम्यान, कॅप्टन जयंत यांचे मोठे भाऊ नील यांनीही शोधमोहिमेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. शोधमोहीम लवकरात लवकर संपवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. संरक्षण दलाची दोनमोठी हत्यारे लष्कर आणि नौदल शोधमोहिमेत गुंतले आहे. तरीही २० दिवसांनंतर आम्हाला हेलिकॉप्टरचे अवशेष आणि जयंतचा मृतदेह एका सरोवरातून बाहेर काढण्याची वाट पाहत आहोत, ही खूप आश्चर्यजनक बाब आहे. ही बाब या शोधमोहिमेवर अनेक प्रश्न उपस्थित करते. मात्र आम्हाला त्यात पडायचे नाही आहे.
कॅप्टन जयंतचे वडील म्हणाले की, गेल्या सात महिन्यांमध्ये रुद्र हेलिकॉप्टरच्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये स्क्वाड्रनच्या तीन पायलटांचा मृत्यू झाला आहे. तर एक पायलट गंभीर जखमी झाला आहे. कदाचित आता त्याला पुन्हा उड्डाण करता येणार नाही. पायलट एक एक करून मरत आहेत. ही बाब चिंतेची आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.