चंदिगड : पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी रविवारी त्यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेसच्या 22 उमेदवारांची नावे जाहीर केली. पटियाला शहरमधून कॅप्टन अमरिंदर सिंग निवडणूक लढवणार आहेत. 22 उमेदवारांपैकी 2 माढा, 3 दोआबा आणि 17 मालवा विभागातून उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. तसेच, कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, उमेदवारांची दुसरी यादी दोन दिवसांत जाहीर केली जाईल.
एवढेच नाही तर उमेदवारांची यादी जाहीर करताना कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर निशाणा साधला. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांना निवडणूक जिंकू देणार नसल्याचे सांगितले. तसेच, नवज्योतसिंग सिद्धू पूर्णपणे अक्षम माणूस आहे. तो सर्व वेळ वाया घालवणारा आहे, असे कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष 38 जागांवर निवडणूक लढवत आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग पहिल्यांदाच काँग्रेस सोडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत त्यांची भाजपाशी युती आहे. पक्षाने यावेळी नऊ जाट शीख, चार दलित, तीन ओबीसी, पाच हिंदू आणि एका महिलेला तिकीट दिले आहे.
दरम्यान, यंदाच्या पंजाब विधानसभा निवडणुकीत कॅप्टन अमरिंदर सिंग हे भाजपा आणि शिरोमणी अकाली दल युनायटेडसोबत रिंगणात आहेत. भाजपाने आपले 35 उमेदवार जाहीर केले आहेत. त्याचबरोबर शिरोमणी अकाली दल युनायटेडने 14 जागांसाठी उमेदवारांची नावेही जाहीर केली आहेत.
कोणाला तिकीट कुठून मिळाले?भटिंडा शहर- राज नंबरदारभटिंडा ग्रामीण - सवेरा सिंगभदौर - धरमसिंग फौजीमालेरकोटला - फरजाना आलम खानपटियाला ग्रामीण - संजीव शर्मापटियाला शहर - कॅप्टन अमरिंदर सिंगअमृतसर दक्षिण - हरजिंदर सिंग ठेकेदारफतेहगढ चुडियां - तजिंदर सिंग रंधावाभुलत्थ - अमनदीपसिंग गोरा गिलनकोदर - अजित पाल सिंगनवांशहर - सतबीर सिंगलुधियाना पूर्व - जगमोहन शर्मालुधियाना दक्षिण - संतिंदर पाल सिंग ताजपुरीआत्मनगर - प्रेम मित्तलदाखा - दमनजीतसिंग मोहीधरमकोट - रविंदर सिंग ग्रेवालसमाना - सुरिंदर सिंग खेरकीसनौर - बिक्रमजीत इंदर सिंग चहलबुधलाडा - सुभेदार भोला सिंगरामपुरा फूल - अमरजीत शर्मानिहाल सिंग वाला - मुखतियार सिंगखरड - कमलदीप सैनी