शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
3
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
4
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
5
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
6
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
7
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
8
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
10
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
11
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
12
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी
13
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
14
Girnar Parikrama 2024: 'या' पाच दिवसांतच गिरनारच्या जंगलात मिळतो प्रवेश; जेवढ्या यातना तेवढाच आनंद!
15
शरद पवारांवरील टीका 'मानसपुत्रा'च्या जिव्हारी; निषेध व्यक्त करत वळसे पाटलांनी खोतांना दिला इशारा
16
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
17
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
18
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
19
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
20
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...

Captain Amarinder Singh: कॅप्टन अमरिंदर राजकीय लढाई हरले, पण त्यांचा मुलगा ही निवडणूक जिंकला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 8:51 AM

Punjab Politics, raninder singh win: मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेस प्रदेशामध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील छत्तीसचा आकडा, त्यातून दोघांचे झालेले गट, वाढलेली गटबाजी यामुळे पक्ष नेतृत्वाने अमरिंदर यांचा राजीनामा घेतला आहे. यामुळे गुजरातचे वादळ शमत नाही तोच पंजाबमध्ये सत्तेचे दुसरे वादळ सुरु झाले आहे.

पंजाबमध्ये गेल्या काही महिन्यांपासून नवज्योतसिंग सिद्धू (navjot singh sidhu) आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (captain amarinder singh) यांच्यात घमासान सुरु आहे. याची अखेर अमरिंदर यांचा राजीनामा घेण्यात झाला आहे. वडील अमरिंदर भलेही राजकीय युद्ध हरले असतील तरी त्यांचा मुलगा रनिंदर सिंग हे चौथ्यांदा भारतीय राष्ट्रीय रायफल संघ (एनआरएआय) चे अध्यक्षपद जिंकले आहे. त्यांनी बसपा खासदार श्याम सिंह यादव यांना तब्बल 56-3 एवढ्या मतफरकाने हरविले आहे. (captain amrinder singh's son raninder singh wins nrai elections)

एनआरएआयच्या 59 सदस्यांनी अध्यक्ष निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला होता. यामध्ये रनिंदर यांना 56 मते मिळाली. यादव हे उत्तर प्रदेश रायफल संघाचे अध्यक्ष आहेत. एनआरएआय निवडणुकीविरोधात दिल्ली उच्चन्यायालयात यादव यांनी याचिका दाखल केली होती. यानंतर क्रीडा मंत्रालयाने पन्हा नवीन निवडणूक प्रक्रिया सुरु करावी असे निर्देश दिले होते. परंतू तरीही तीन निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यादव हे उत्तर प्रदेशच्या जौनपूर लोकसभा मतदारसंघातून बसपाचे खासदार आहेत.

पंजाबमध्ये काय घडतेय...मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेस प्रदेशामध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील छत्तीसचा आकडा, त्यातून दोघांचे झालेले गट, वाढलेली गटबाजी आणि त्यामुळे निर्माण झालेली अस्वस्थता व असंतोष यांचा स्फोट होत आहे, हे लक्षात येताच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपद सोडण्याचे आदेश शनिवारी दिले. त्यामुळे सिंग यांनी पद सोडले खरे, तर तसे करताना थेट बंडाचीच भाषा केली.

राजीनामा द्या, माझा नाईलाज आहेपण तुम्हाला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावाच लागेल, अशा शब्दांत सोनिया गांधी यांनी अमरिंदर सिंग यांना आदेश देण्यात आला. त्यावेळीही आपल्यामागे इतके आमदार आहेत, आता नेता बदलल्यास विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होईल, सिद्धू यांना मुख्यमंत्री करणे हे तर काँग्रेस व राज्यासाठी मोठे संकटच ठरेल, असे सिंग यांनी सोनिया गांधी यांना सांगितले. त्यावर माझा नाईलाज आहे, तुम्हाला राजीनामा द्यावाच लागेल, असे त्या म्हणाल्या. 

नवज्योत सिद्धू पाकचे हस्तक : अमरिंदर सिंगनवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाबचे मुख्यमंत्री अजिबात करू नका, त्यांचे पाकिस्तानशी संबंध आहेत, पंतप्रधान इम्रान खान व तेथील लष्करप्रमुख बाजवा हे सिद्धू यांचे दोस्त आहेत, असा आरोप करत या सर्व बाबी आपण काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कानावर घातल्या असल्याचे अमरिंदर यांनी सांगितले. तसेच सिद्धू यांना मुख्यमंत्री होऊ देणार नाही. सिद्धू यांना मुख्यमंत्री केल्यास पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :Punjabपंजाबcongressकाँग्रेस