कर्नाटकमधील कोडागू येथे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका भाजपाच्या नेत्याचा कारखाली चिरडून मृत्यू झाला आहे. त्यानंतर भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी कोडागू पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करून आंदोलन केलं.
दरम्यान, कोडागूच्या SPनीं याबाबत माहिती देताना ही हिट अँड रनची घटना होती. त्यात कारखाली चिरडून एका भाजपाच्या नेत्याचा मृत्यू झाला. हा अपघात कुशालनगर तालुक्यातील वलनूर गावात घडला. या प्रकरणी तीन लोकांविरोधात भादंवि कलम ३०२ अन्वये एफआयआर नोंदवण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
कर्नाटकमध्ये लोकसभेच्या २८ जागा आहेत. तसेच येथे राज्यातील सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपा-जेडीएस आघाडी यांच्यामध्ये मुख्य लढत आहे. मागच्या निवडणुकीत कर्नाटकमध्ये भाजपाने २५ हून अधिक जागा जिंकल्या होत्या.