शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १३ नोव्हेंबर २०२४, लाभदायी दिवस, नोकरीत यश मिळेल, घरातील वातावरण सुखद राहील
3
झारखंडमध्ये आज मतदान,  १० राज्यांत होणार पोटनिवडणूक
4
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
5
आजचा अग्रलेख: भुजबळ ‘सीएम’ का झाले नाहीत?
6
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
7
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
8
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
9
उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!
10
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
11
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
12
मतदान केंद्रांवर ‘सबकुछ महिला’: मतदान वाढणार?; राज्यात ४२६ केंद्रांवर महिला अधिकारी, कर्मचारी सज्ज
13
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
14
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
15
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
16
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
17
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
19
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
20
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस

उभ्या ट्रकवर कार धडकली पाळधीजवळ अपघातात एक ठार : एअर बॅगमुळे तिघे बचावले, मयत मनोहर जोशींचा नातेवाईक

By admin | Published: January 21, 2016 12:03 AM

जळगाव: महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर मागून येणारी कार धडकल्याने त्यात जोतेंद्र नरसिंह पंडित (वय ५९ रा.चेंबुर,मुंबई) हे जागीच ठार झाले तर त्यांच्या पत्नी कृपा जातेंद्र पंडीत (वय ५०), साडू धनंजय काशीनाथ व्यवहारे (वय ५७ रा.अंधेरी,मुंबई) व्यवहारे यांच्या पत्नी कामिनी व्यवहारे (वय ५१) या गंभीर जखमी झाल्या आहेत. मयत पंडित हे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मुलाचे साडू आहेत. हा अपघात बुधवारी सकाळी अकरा वाजता पाळधीजवळील तोतला पेट्रोल पंपाजवळ झाला.

जळगाव: महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर मागून येणारी कार धडकल्याने त्यात जोतेंद्र नरसिंह पंडित (वय ५९ रा.चेंबुर,मुंबई) हे जागीच ठार झाले तर त्यांच्या पत्नी कृपा जातेंद्र पंडीत (वय ५०), साडू धनंजय काशीनाथ व्यवहारे (वय ५७ रा.अंधेरी,मुंबई) व्यवहारे यांच्या पत्नी कामिनी व्यवहारे (वय ५१) या गंभीर जखमी झाल्या आहेत. मयत पंडित हे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मुलाचे साडू आहेत. हा अपघात बुधवारी सकाळी अकरा वाजता पाळधीजवळील तोतला पेट्रोल पंपाजवळ झाला.

शेगावला गेले होते दर्शनाला
पंडीत व व्यवहारे हे दोन्ही परिवार शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले होते. शेगाव येथून सकाळी ते कारने (क्र.एम.एच.०२ बी.टी.४३६३)मुंबईला परतीच्या प्रवासाला निघाले. महामार्गावर पाळधीजवळील तोतला पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर (क्र.एम.एच.१९ जे.००७७) त्यांची कार जावून धडकली. कारचालक धनंजय व्यवहारे यांना रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला.

मनोहर जोशींनी केला फोन
अपघाताची माहिती मिळताच मनोहर जोशी यांनी आमदार गुलाबराव पाटील यांना ही माहिती दिली.पाटील हे मुंबईतच असल्याने त्यांनी पाळधी येथे त्यांचे कार्यकर्ते गोकुळ पाटील व जळगावात गजानन मालपुरे यांना तातडीने मदत करण्याची विनंती केली. गोकुळ पाटील यांनी लागलीच कारमधील चौघांना जळगावला गणपती हॉस्पिटलमध्ये हलविले. त्यात चालकाच्या शेजारी बसलेले जोतेंद्र पंडीत यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

ट्रकचालकासह कारमधील तीघे बचावले
ट्रकमध्ये किरकोळ बिघाड झाल्याने चालक देवानंद हिरामन तायडे (वय ४५ रा.पहुर) यांनी रस्त्याच्या बाजूला जॅकवर ट्रक लावला होता.मागील बाजूस खाली दुरुस्तीचे काम करत असताना मागून आलेली ही कार ट्रकवर आदळल्याने तायडे यांनाही जबर मार बसला तर कारमधील अन्य तीघे जण हे एअरबॅगमुळे बचावले. फैजपुर साखर कारखान्यासाठी लागणार ऊस घेण्यासाठी हा ट्रक जवखेडा ता.एरंडोल येथे जात होता.