ऑनलाइन लोकमत
दार्जिलिंग, दि. १५ - राष्ट्रपतींच्या सुरक्षा ताफ्यातील कार शुक्रवारी सकाळी दार्जिलिंगजवळ दरीत कोसळली. या दुर्घटनेत राष्ट्रपतींना कोणतीही दुखापत झालेली नाही ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास दार्जिलिंगपासून १६ किमी अंतरावर सोनाडाजवळ ही कार दरीत कोसळली.
राष्ट्रपती बागडोगरा येथे चालले होते. तिथून ते दिल्लीला परतणार होते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या ताफ्यामागे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा वाहन ताफा होता. प्रणव मुखर्जी यांच्या गाडीच्या मागे असलेले तिसरे वाहन दरीत कोसळले. या गाडीत पाचजण होते. या पाचही जणांची सुटका करण्यात आली असून, ते जखमी झाले आहेत.
आम्ही लगेच प्रणव मुखर्जींना या अपघाताची माहिती दिली आणि बचावकार्य सुरु केले असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले. पावसामुळे रस्ते निसरडे झाल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर ममता बॅनर्जी लगेच आपल्या गाडीतून उतरल्या आणि बचाव कार्यात गुंतल्या असे स्थानिकांनी सांगितले. जखमींना दार्जिलिंग येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
Mishap involving WB Chief Minister and President's cavalcade in Darjeeling pic.twitter.com/93YjVd2wc0— ANI (@ANI_news) July 15, 2016