ऑनलाइन लोकमत
मध्यमवर्गीय भारतीय जनता आपल्या आरोग्याचा खर्च स्वत:च करते याचा संदर्भ देत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींनी आरोग्याची काळजी घ्या आणि करही वाचवा असा प्रस्ताव अर्थसंकल्पात मांडला आहे. तसेच बहुसंख्य भारतीयांना पेन्शनचे कवच नसल्याचा दाखला देताना सर्वसामान्यांनी न्यू पेन्शन स्कीममध्ये गुंतवणूक करावी असे प्रोत्साहन जेटलींनी दिले आहे.
आरोग्य विम्यामध्ये गुंतवणूक केली असता आत्तापर्यंत १५ हजार रुपयांचे उत्पन्न करमुक्त होते, ही मर्यादा त्यांनी वाढवून २५ हजार रुपये केली आहे. तसेच, आधीच्या करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादांना व करसवलतींना कायम ठेवले असले तरी जेटलींनी न्यू पेन्शन स्कीममध्ये करसवलतीची मर्यादा एक लाख रुपयांवरून वाढवून दीडलाख म्हणजे अतिरिक्त ५० हजार रुपयांची केली आहे. नोकरदार वर्गाला वाहन भत्त्यापोटी मिळणा-या पैशामधील वार्षिक ९,६०० रुपये करमुक्त होते, ही मर्यादा दुप्पट करत ती १९,२०० रुपये करण्यात आली आहे.