पुणे : वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) जाचक अटी, डिझेलचे वाढलेले दर, प्रादेशिक परिवहन विभागातील भ्रष्टाचार आदींविरोधात आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसतर्फे सोमवारी आणि मंगळवारी देशव्यापी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती गुड्स अॅण्ड पॅसेन्जर ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली. या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.
जीएसटीतील काही अटींमुळे जुन्या गाड्यांच्या विक्रीसह इतर गाड्यांच्या विक्रीवर दुहेरी कराला प्रोत्साहन मिळत आहे. ई-मार्ग विधेयक आणि प्रस्तावित ई-वे बिल हे परिवहन क्षेत्रासाठी अनुकूल नाही. जुन्या गाड्यांच्या विक्रीवर जीएसटी लागू करू नये, परिवहन कार्यालय क्षेत्रांतर्गत सेवा कर आणि मालवाहक प्रमाण चलान असलेल्यांना ई-मार्ग बिल लागू करू नये, अशी मागणी संघटनेने केली आहे.
नवी मुंबई : ट्रक टर्मिनल मालवाहतूक संघटनेचे चक्काजाम, वाशी APMC मार्केट ट्रक टर्मिनलमध्ये गाड्या उभ्या आहेत