चेन्नई : व्यंगचित्राद्वारे तामिळनाडू सरकारवर टीका करणा-या तिरुनलवेली येथील व्यंगचित्रकार जी. बाला यांची सोमवारी जामिनावर सुटका करण्यात आली. त्याच्या अटकेच्या निषेधार्थ सर्व पत्रकारांनी आज चेन्नई, तसेच अन्य शहरांत निदर्शने केली. बाला यांच्या अटकेमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.तिरुनलवेली जिल्ह्यातील एका शेतकरी दाम्पत्याने आपल्या दोन मुलींसह सावकारी पाशामुळे जिल्हाधिकाºयांच्या कार्यालयासमोर आत्मदहन केले होते. त्या निमित्ताने राज्यकर्ते व प्रशासन कसे असंवेदनशील आहे, असे दर्शविणारे व्यंगचित्र जी. बाला यांनी फेसबुकवर टाकले होते. ते व्हायरल होताच, त्यांना अटक करण्यात आली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच जिल्हाधिकारी यांची बदनामी करणे व माहिती तंत्रज्ञान कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल त्याला अटक झाली.चित्रपट अभिनेते कमल हसन यांनी मात्र जी बाला यांचे जोरदार समर्थन केले. ते म्हणाले की, सत्य बोलणाºयांना अटक करणार असाल, तर देशातील कारागृहेही कमी पडतील. आत्मदहन करणाºयांविषयी असंवेदनशीलता आणि टीका करणाºयांना शिक्षा हा अजब प्रकार आहे, असेही त्यांनी बोलून दाखविले.
व्यंगचित्रकाराची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 4:44 AM