ेंघरगुती गॅसप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Published: January 06, 2016 1:51 AM
सोलापूर : बेकायदेशीररित्या घरगुती गॅस इंधन म्हणून वाहनात भरत असताना छापा टाकून 9 हजार रुपयांचे साहित्य जप्त करून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई नई जिंदगी परिसरात मंगळवारी दुपारी करण्यात आली. मनोज गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन मोसीन उर्फ राजीव महेबुब पटेल यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सोलापूर : बेकायदेशीररित्या घरगुती गॅस इंधन म्हणून वाहनात भरत असताना छापा टाकून 9 हजार रुपयांचे साहित्य जप्त करून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई नई जिंदगी परिसरात मंगळवारी दुपारी करण्यात आली. मनोज गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन मोसीन उर्फ राजीव महेबुब पटेल यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.किराणा दुकानातून 72 हजाररुपयांचे दागिने पळविले सोलापूर : शहरातील विडी घरकूल परिसरातील सुमित प्रोव्हिजन स्टोअर्समधून एका इसमाने 72 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पळविले. ही घटना मंगळवारी घडली.वसंत यणगन यांच्या फिर्यादीवरून एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यणगन यांच्या दुकानात येऊन या इसमाने ऊदबत्ती पुडा मागितला. त्यावेळी यणनग हे इसमाला ऊदबत्ती पुडा देत असताना त्याने त्यांची नजर चुकवून दुकानाच्या गल्ल्यातील 72 हजार रुपयांचे दागिने पळविले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.