करीना कपूरविरोधात उच्च न्यायालयात खटला दाखल, वादग्रस्त पुस्तकामुळे ख्रिश्चन संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 09:07 PM2022-08-04T21:07:13+5:302022-08-04T21:07:46+5:30

Kareena Kapoor : पुढील सुनावणी 16 सप्टेंबर रोजी होणार आहे.

Case filed against Kareena Kapoor in High Court, Christian angry over controversial book | करीना कपूरविरोधात उच्च न्यायालयात खटला दाखल, वादग्रस्त पुस्तकामुळे ख्रिश्चन संतप्त

करीना कपूरविरोधात उच्च न्यायालयात खटला दाखल, वादग्रस्त पुस्तकामुळे ख्रिश्चन संतप्त

googlenewsNext

जबलपूर : चित्रपट अभिनेत्री करीना कपूर खानच्या गर्भधारणेशी संबंधित ‘करीना खान प्रेग्नन्सी बायबल’ या वादग्रस्त पुस्तकाचे प्रकरण आता जबलपूर उच्च न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणावरील प्राथमिक सुनावणीनंतर बुधवारी न्या. डी. के. पालीवाल यांच्या एकल खंडपीठाने राज्य सरकारला पक्षकार बनवण्याचे निर्देश दिले आहेत, ज्याची पुढील सुनावणी 16 सप्टेंबर रोजी होणार आहे.

ख्रिश्चन धर्माच्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या

याचिकाकर्ते वकील क्रिस्टोफर अँथनी यांनी सादर केले की, करीना खान प्रेग्नन्सी बायबल नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे, ज्यामध्ये ख्रिस्ती धर्माच्या पवित्र पुस्तकाचे शीर्षक बायबल आहे. बायबल हा शब्द करीना खान प्रेग्नन्सी बायबल या पुस्तकाच्या शीर्षकाला जोडला गेला आहे. ख्रिश्चन धर्माच्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

उच्च न्यायालयात याचिका दाखल

क्रिस्टोफर अँथनी यांनी सांगितले की, या संदर्भात ओमटी पोलिस स्टेशन आणि पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करून करीना आणि प्रकाशकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. कारवाई न झाल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.

करिनाने पुस्तकाला तिचं तिसरं अपत्य सांगितलं

करीना कपूर खानने 9 जुलै 2021 रोजी तिचे पुस्तक लॉन्च केले. फेब्रुवारीमध्ये दुस-या मुलाला जन्म देणाऱ्या करीनाने (४०) या पुस्तकाचे तिसरे अपत्य म्हणून वर्णन केले होते. पुस्तकाच्या प्रमोशनच्या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्या होत्या.

असा उल्लेख पुस्तकात आहे

करीना कपूर खानच्या म्हणण्यानुसार, या पुस्तकात तिने तिच्या दोन्ही गर्भधारणेदरम्यान अनुभवलेल्या शारीरिक आणि भावनिक अनुभवांचा उल्लेख केला आहे. या पुस्तकावरून बराच वादंग सुरू असून आता उच्च न्यायालयात याप्रकरणी खटला दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Case filed against Kareena Kapoor in High Court, Christian angry over controversial book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.