नवी दिल्ली : ईडीने दाखल केलेल्या खटल्यात माजी वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. मात्र सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणात चिदम्बरम यांना कोठडीतच राहावे लागणार आहे.
न्या. भानुमती व न्या. ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठासमोरील या दोन्ही प्रकरणांची सुनावणी २६ आॅगस्ट रोजी होणार आहे. सुनावणीच्यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता व चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांच्यातजोरदार युक्तिवाद झाला. ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात चिदम्बरम यांना अटकपूर्व जामीन देण्यास तुषार मेहता यांनी जोरदार विरोध केला.
तुषार मेहता यांनी सांगितले की, चिदम्बरम सीबीआय कोठडीत असल्याने त्यांना ईडीने दाखल केलेल्या प्रकरणी तोपर्यंत अटक करता येणे शक्य नाही.