मुंबई : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्याचा तपास करणाºया सक्तवसुली संचालनालयाला (ईडी), नीरव मोदीची परदेशातील संपत्ती व व्यवसायाची चौकशी करायची आहे. त्याबद्दल संबंधित देशांकडून माहिती मिळावी, याकरिता ईडीनेड विशेष पीएमएलए न्यायालयाला ‘लेटर आॅफ रोगेटरी’ (एलआर) देण्याची विनंती सोमवारी केली.प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रिंग अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत एलआर काढण्यासाठी ईडीने हा अर्ज केला. हाँगकाँग, यूएसई, युके, यूएई, दक्षिण आफ्रिका आणि सिंगापूर या देशांत नीरव मोदीची संपत्ती आहे. तो या देशांत व्यवसाय करत होता. त्यामुळे या गुुन्ह्यासंबंधी आवश्यक कागदपत्रे संबंधित देशांकडून मिळावी, याकरिता एलआर काढावे, अशी विनंती ईडीने विशेष न्यायालयाला केली.न्या. एम. एस. आझमी यांनी ईडीचा युक्तिवाद ऐकला. ‘नीरव मोदी याने अनेक फर्म स्थापन केल्या. तो अनपॉलिश हिरे खरेदी करून, त्यांना पॉलीश करत असे. त्याचे दागिने करून विकत असे किंवा नुसता हिराही विकत असे. त्याने त्याचा कारभार हाँगकाँग, यूएसई, यूके, यूएई, दक्षिण आफ्रिका आणि सिंगापूरमध्ये पसरविला. पीएनबीने त्याच्या फर्म्सच्या नावावर दिलेल्या अंडरटेकिंगचा वापर करून, त्याने अनेक व्यावसायिकांशी व्यवहार करून त्याचे पैसे दिले. मात्र, त्याने बँकेला फसवून व्यवहार केला.मोदीच्या फर्म्सला अंडरटेकिंग दिल्याचे बँकेच्या दप्तरी नोंद नाही. मोदीने फसवणूक व षड्यंत्र रचून बँकेला लुटले, असे ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले.
नीरव मोदी प्रकरणी ईडीची न्यायालयात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 3:31 AM