शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

आधी पाकिस्तानचा विजयोत्सव साजरा केला, खटला दाखल होताच म्हणाले- 'माफ करा, आमचं करिअर खराब होईल...'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 6:35 PM

जम्मू-काश्मीर पोलिसांनी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांविरुद्ध UAPA अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

श्रीनगर: T-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताननेभारताचा पराभव केला. यानंतर भारतात अनेक ठिकाणी पाकिस्तानचा विजयोस्तव साजरा केल्याच्या घटना घडल्या. आता जम्मू-काश्मीर पोलिसांनी पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा केल्याबद्दल दोन वैद्यकीय महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांविरुद्ध बेकायदा प्रतिबंधक हालचाली(UAPA) कायद्यांतर्गत दोन गुन्हे दाखल केले आहेत. 

रविवारी दुबईत झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाला. यानंतर काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला, फटाके फोडण्यात आले. याचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील करण नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस श्रीनगर सौरा यांच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर UAPA अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

विद्यार्थ्यांच्या कृत्याचे समर्थन नाही, पण...दरम्यान, जम्मू आणि काश्मीर स्टुडंट्स युनियनने लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी मानवतावादी आधारावर UAPA अंतर्गत केलेले आरोप रद्द करण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले की, आम्ही विद्यार्थ्यांनी केलेल्या कृत्याचे समर्थन करत नाहीत. पण, ही शिक्षा त्यांच्यासाठी खूप मोठी आहे. यामुळे मुलांचे भविष्य खराब होऊ शकते. तसेच, युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते, नासेर खुहेमी यांनी एका निवेदनात म्हटले की, UAPA अंतर्गत विद्यार्थ्यांवरील आरोप कठोर शिक्षा आहेत. यामुळे त्यांचे भविष्य उध्वस्त होईल आणि ते कट्टरावादाकडे वळतील. या आरोपांचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर आणि करिअरवर गंभीर परिणाम होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना इतकी कठोर शिक्षा देऊ नये. 

'फटाके फोडणाऱ्यांचा डीएनए भारतीय नाही'हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना पाकिस्तानच्या विजयावर आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांवर जोरदार टीका केली. पाकिस्तानचा विजयोस्तव साजरा करत फटाके फोडणाऱ्यांचा भारतीय डीएनए असू शकत नाही. आपल्याच देशात दडलेल्या देशद्रोहींपासून सावध राहण्याची गरज आहे, असं ते म्हणाले.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरT20 World Cupट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१Pakistanपाकिस्तानIndiaभारतStudentविद्यार्थी