शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
2
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
3
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
4
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
6
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
7
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
8
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
9
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
10
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
11
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
12
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
13
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
14
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
15
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
16
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
17
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
18
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
19
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
20
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?

Cash for Questions Case : महुआ मोईत्रांनी लोकसभेच्या आचार समितीच्या समन्सला दिलं उत्तर, मागितला आणखी वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 5:38 PM

Cash for Questions Case : महुआ मोईत्रा यांनी लोकसभेच्या आचार समितीसमोर हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे.

नवी दिल्ली : पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा अडचणीत सापडल्या आहेत. याप्रकरणी लोकसभेच्या आचार समितीने महुआ मोईत्रा यांना ३१ ऑक्टोबरला हजर राहण्यासाठी समन्स पाठवले आहे. मात्र, महुआ मोईत्रा यांनी लोकसभेच्या आचार समितीसमोर हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) त्यांनी ही माहिती दिली आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, महुआ मोईत्रा यांनी ३१ ऑक्टोबरला आचार समितीसमोर हजर राहण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. महुआ मोइत्रा यांनी आरोपांच्या संदर्भात लोकसभेच्या आचार समितीच्या समन्सला उत्तर देताना सांगितले की, ५ नोव्हेंबरनंतर समितीच्या पसंतीच्या कोणत्याही तारखेला व वेळेत समितीसमोर प्रत्यक्ष हजर राहू शकते. दुर्गा पूजा उत्सवाचा संदर्भ देत महुआ मोईत्रा यांनी लिहिले, "मी पश्चिम बंगाल राज्याचे प्रतिनिधित्व करते, जिथे दुर्गा पूजा हा सर्वात मोठा सण आहे. माझ्या क्षेत्रातील अनेक पूर्व-नियोजित विजयादशमी परिषद/बैठकांना (सरकारी आणि राजकीय दोन्ही) उपस्थित राहण्यासाठी मी आधीच वचनबद्ध आहे".

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, महुआ मोईत्रा यांनी एक्सवर एक पत्र पोस्ट केले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आचार समितीच्या अध्यक्षांनी लाईव्ह टीव्हीवर माझे ३१/१० समन्स जाहीर केले, जे मला अधिकृत पत्र संध्याकाळी ७.२० वाजता ईमेल केले. सर्व तक्रारी आणि स्वत:हून प्रतिज्ञापत्रेही प्रसारमाध्यमांना प्रसिद्ध करण्यात आली. माझ्या पूर्वनिर्धारित मतदारसंघातील कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर मी ४ नोव्हेंबर रोजी उत्तर देण्यासाठी समितीसमोर उपस्थित राहू शकते."

दरम्यान, याआधी समितीने गृहमंत्रालयाकडेमहुआ मोईत्रा यांच्या गेल्या पाच वर्षांतील परदेश दौऱ्यांचा तपशील मागवला होता. महुआ मोईत्रा देशाबाहेर कुठे गेल्या? आणि त्यांनी याबाबत लोकसभेत माहिती दिली की नाही? याची चौकशी समिती करणार आहे. यानंतर, त्यांचे लॉगिन त्यांच्या एमपी आयडीला जोडले जाईल. तसेच, महुआ मोईत्रा यांच्याशी संबंधित वादात आयटी मंत्रालयाकडून आधीच माहिती मागवण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?निशिकांत दुबे यांनी गेल्या आठवड्यात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून महुआ मोईत्रा यांच्याविरोधात तक्रार केली आहे. तसेच, लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप निशिकांत दुबे यांनी केला. यानंतर दर्शन हिरानंदानी यांनी मोठा खुलासा केला. उद्योगपती गौतम अदानींबद्दल मोदी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोईत्रा यांचा वापर केल्याचे स्वतः दर्शन हिरानंदानी यांनी कबूल केले. केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी महुआ मोईत्रा यांच्या संसदीय लॉगिनचा वापर केल्याचेही दर्शन हिरानंदानी यांनी सांगितले. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. दुसरीकडे, महुआ मोईत्रा यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) आणि लोकसभेच्या आचार समितीच्या 'प्रश्नांची उत्तरे' देण्यास तयार आहे, असे महुआ मोईत्रा यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Mahua Moitraमहुआ मोईत्राParliamentसंसदlok sabhaलोकसभा