हैदराबाद : तेलंगणच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी मंडळ महसूल महिला अधिकारी (तहसीलदार) व्ही. लावण्या यांच्या घरातून रोख ९३.५ लाख रुपये जप्त केल्यानंतर त्यांना अटक केली. व्ही. लावण्या यांना उत्कृष्ट तहसीलदार म्हणून पुरस्कार दिला गेला होता.
व्ही. लावण्या या केशमपेट (जिल्हा रंगा रेड्डी) येथील मंडळ अधिकारी आहेत. त्यांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. लावण्या यांच्याकडे उत्पन्नाच्या त्यांच्या ज्ञात मार्गांपेक्षा १.०७ कोटी रुपये जास्त सापडले. हैदराबादजवळ असलेल्या हयातनगरमधील त्यांच्या घरी घातलेल्या छाप्यात ५०० आणि २,००० रुपयांच्या नोटांची बंडले आणि ४० तोळे सोने जप्त करण्यात आले. राज्यात सरकारी अधिकाºयाकडून एवढी मोठी रोख रक्कम जप्त केली जाण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जाते. व्ही. लावण्या यांचे पती वेंकटेश नायक हे नगरपालिकेत नोकरीत आहेत.
तक्रारदार शेतकºयाकडून चार लाख रुपये मंडळ महसूल अधिकारी कार्यालयाला पाठवून अनंतया याला रेडहँड पकडण्यात आले. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत अनंतया याने तीन लाख रुपये व्ही. लावण्या यांना दिले जाणार होते, असे सांगितले. त्यानंतर एसीबीने लावण्या यांच्या घरी छापा घालून रोख व सोने जप्त केले. लावण्या यांच्या संपत्तीची चौकशी करीत असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
शेतकºयाला मागितले ८ लाख रुपयेशेतकºयाकडून लाच घेतल्याबद्दल ग्राम महसूल अधिकारी अनंतया याला अटक झाल्यानंतर एसीबीने लावण्या यांच्या घरी छापा घातला.नऊ एकर जमिनीच्या अधिकृत नोंदणीच्या कामासाठी अनंतया याने शेतकºयाला आठ लाख रुपयांची लाच मागितली होती.शेतकºयाने त्यापैकी ३० हजार रुपये त्याला देऊन एसीबीकडे तक्रार केली होती.