शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

औद्योगिक क्षेत्रात कॅशलेस वेतन

By admin | Published: December 22, 2016 12:54 AM

केंद्र सरकारने वेतनविषयक दुरुस्ती करण्यासाठी वटहुकूम आणण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे कंपन्या व औद्योगिक क्षेत्रातील

नवी दिल्ली : केंद्र सरकारने वेतनविषयक दुरुस्ती करण्यासाठी वटहुकूम आणण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे कंपन्या व औद्योगिक क्षेत्रातील वेतन चेक व इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करावे लागणार आहे. ज्या आस्थापनांमध्ये १0 वा त्याहून अधिक कामगार आहेत आणि ज्यांचे वेतन १८ हजार रुपये वा त्याहून अधिक आहे, त्यांचे वेतन रोखीने न देता चेक वा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करावे लागेल, असे केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी सांगितले.अर्थात या वेतनविषयक कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार असली तरी कामगारांना रोखीने पगार देण्याचा पर्याय बंद करण्यात आलेला नाही. जिथे रोजंदारीने काम करणारे कामगार आहेत वा ज्या कामगारांचे वेतन १८ हजार रुपयांहून कमी आहे, तिथे त्यांना रोख रकमेत पगार देता येईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेतन कायद्यात १९३६ मध्ये दुरुस्तीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी वटहुकुमाचा मार्ग निवडला. यामुळे कंपन्या व औद्योगिक क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व चेकने वेतन करता येणार आहे. याशिवाय मालकाकडे रोखीने वेतन करण्याचाही पर्याय असणार आहे. नव्या नियमांना तत्काळ क्रियान्वित करण्यासाठी सरकार वटहुकूम आणते. मात्र वटहुकूम सहा महिन्यांसाठी वैध असतो. या काळात वटहुकुमाचे नियमित कायद्यात रूपांतर करण्यासाठी त्याबातचे विधेयक संसदेत मांडून मंजूर करून घेणे आवश्यक असते. वेतन कायदा (दुरुस्ती) २०१६ नुसार मूळ कायद्याच्या कलम ६ मध्ये दुरुस्तीचा प्रस्ताव आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)