एस. पी. सिन्हा
पाटणा : जाती जनगणनेची आकडेवारी जाहीर करणारे बिहार पहिले राज्य ठरले आहे. राज्यात अत्यंत मागासवर्गीय (ईबीसी) ३६ टक्के, इतर मागासवर्गीय (ओबीसी) २७ टक्के आहेत.
बिहार सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव विवेक कुमार सिंह यांनी जात आधारित जनगणना २०२२ च्या पुस्तिकेचे प्रकाशन केले. ते म्हणाले, बिहारची लोकसंख्या १३ कोटी ७ लाख २५ हजार ३१० आहे. त्यात २ कोटी ८३ लाख ४४ हजार १६० कुटुंबे आहेत. अनुसूचित जाती १९.६५ टक्के, अनुसूचित जमाती १.६८ आणि सामान्य प्रवर्ग १५.५२ टक्के आहेत. बिहारमध्ये सुमारे ८२ टक्के हिंदू व १७.७ टक्के मुस्लिम आहेत.
२०११ ते २०२२ दरम्यान बिहारमध्ये हिंदूंची लोकसंख्या कमी झाली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, हिंदू लोकसंख्या ८२.७ टक्के आणि मुस्लिम लोकसंख्या १६.९ टक्के होती. ईबीसी ३६ टक्के, ओबीसी २७ टक्के आहेत. त्यानंतर सर्वाधिक लोकसंख्या यादव (१४.२६) यांची आहे. ब्राह्मण ३.६५ टक्के, राजपूत (ठाकूर)
३.४५ टक्के आहेत. सर्वांत कमी ०.६० टक्के कायस्थ आहेत. सध्या नोकऱ्यांमध्ये १८ टक्के आरक्षण दिले जाते. २७ टक्के ओबीसींना १२ टक्के आरक्षण दिले जाते. गणनेनुसार, बिहारमध्ये उच्च जातींची संख्या १५.५२ टक्के आहे.
धर्मनिहाय लोकसंख्या हिंदू ८१.९% (१०.०७ कोटी)
मुस्लिम १७.७% (२.३१ कोटी)
ख्रिश्चन ०.०५%
शीख ०.०१%
बौद्ध ०.०८%
जैन ०.००९६%
इतर ०.१२%