बिलासपूर (छत्तीसगड) : ‘मागासवर्गीय, आदिवासी आणि महिलांचा सहभाग निश्चित करण्यासाठी काँग्रेस सत्तेत निवडून आल्यास जात जनगणना करील,’ असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी येथे केले. केंद्र सरकारने सत्तेत असताना काँग्रेसने केलेल्या ‘जात जनगणने’चे तपशील का जाहीर केले नाहीत आणि त्यांना याची भीती वाटते का, असा प्रश्नही त्यांनी केला.
परसाडा या गावात ‘आवास न्याय संमेलना’ला संबोधित करताना गांधींनी गर्दीच्या दिशेने रिमोट कंट्रोल फिरवला आणि ‘काँग्रेसने रिमोट दाबले तर गरीब आणि गरजूंना फायदा झाला, तर सत्ताधाऱ्यांनी रिमोट दाबले तेव्हा अदानी यांना बंदरे, विमानतळ आणि रेल्वे मिळाली,’ अशी टीका केली.
काँग्रेसने केलेल्या जातगणनेची आकडेवारी का जाहीर केली नाही?“काँग्रेसने जात जनगणना केली होती. त्यात प्रत्येक जातीच्या लोकसंख्येची नोंद आहे. केंद्र सरकारकडे हा अहवाल आहे, पण तो त्यांना उघड करायचा नाही,” असा दावा राहुल गांधी यांनी केला.
वायनाड नव्हे, हैदराबादेत लढून दाखवाहैदराबाद : ‘एआयएमआयएम’ प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी राहुल गांधी यांना त्यांच्याविरोधात हैदराबादमध्ये निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले आहे. ‘वायनाड सोडा; हैदराबादेत लढून दाखवा’, असे ते सभेत म्हणाले.