शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

बिहारमध्ये होणार जातीनिहाय जनगणना; गणनेसाठी वेळेची मर्यादा घालणार, बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 6:36 AM

सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

- एस. पी. सिन्हापाटणा : बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत जातीनिहाय जनगणना करण्याचा मार्ग मोकळा झाला. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच प्रस्ताव मांडला जाईल, असे नितीशकुमार यांनी सांगितले. जातीनिहाय जनगणना करण्यासाठी वेळेची मर्यादा घातली जाणार आहे. सर्व पक्षांनी एकमताने या निर्णयास पाठिंबा दिला.

विधानसभेत ९ राजकीय पक्ष आहेत. त्यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा झाली. सर्व धर्मांची जातीय जनगणना होईल. जातींबरोबरच उपजातींचीही गणना होईल. या बैठकीला मुख्यमंत्र्यांबरोबरच भाजपचे उपमुख्यमंत्री तारकेश्वर प्रसाद, राजदचे विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव व खा. मनोज झा, एआयएमआयएमचे अख्तरूल ईमान, काँग्रेसचे आ. अजित शर्मा, मालेचे आ. महबूब आलम उपस्थित होते.

आधी सर्वांना प्रशिक्षण दिले जाणार

सर्व पक्ष व विरोधकांशी चर्चा झाल्यानंतर सर्वसंमतीने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करावे लागेल. जातीनिहाय जनगणना करण्यासाठी मोठे मनुष्यबळ लागेल. त्यांना आधी प्रशिक्षण दिले जाईल. जे काही होईल ते सार्वजनिकरीत्या होईल. सर्वांना याची माहिती व्हायला हवी. यासाठी पैशाची गरज पडेल व त्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी दिली जाईल.     - नितीशकुमार

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमार