नवी दिल्ली : कॉमन अॅडमिशन टेस्ट (कॅट) परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. १० उमेदवारांनी परीक्षेत १०० पर्सेंटाईल मिळविले आहेत.१०० पर्सेंटाईल मिळविणारे सर्व १० उमेदवार तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी आहेत. त्यापैकी सहा जण आयआयटीचे, तर दोन जण एनआयटीचे आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक ४ जणांनी १०० पर्सेंटाईल मिळविले आहेत.उरलेले सहा उमेदवार झारखंड, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि उत्तराखंड येथील आहेत. २१ उमेदवारांनी ९९.९ पर्सेंटाईल मिळविले आहेत. त्यातील १९ जण तंत्रज्ञान क्षेत्रातील आहेत. आयआयएम आणि १०० पेक्षा जास्त बिगर-आयआयएम संस्थांच्या एमबीए अभ्यासक्रमासाठी ही परीक्षा घेण्यात येते. मागील १० वर्षांपासून या परीक्षेला मोठ्या संख्येने विद्यार्थी बसत आहेत. यंदा १.३४ लाख पुरुष आणि ७५ हजार महिलांनी ही परीक्षा दिली. पाच तृतीय पंथीयही परीक्षेलाबसले.
‘कॅट’मध्ये १० उमेदवारांनी मिळविले १०० पर्सेंटाईल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 6:13 AM