आरम नदीवरील केटीवेअर बंधारा निधी अभावी रखडला
By admin | Published: August 10, 2015 12:28 AM
निकवेल : आरम नदीवर केटीवेअर बंधारा व्हावा म्हणून लोक प्रतिनिधींनी लक्ष घालून लवकरात लवकर केटीवेअर करण्याची मागणी नदीकाठ परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. आरम नदीवर केटीवेअरचे मोजमाप अधिकारी करून घेतात आणि निघून जातात. असे बर्याच वर्षापासून सुरू आहे. त्यातच मागच्या आठवड्यात लघुसिंचन जलसंधारण उपविभागीय अभियंता राजेंद्र धूम, शाखा अभियंता पी. डी. जाधव, सचिन गुंजाळ, टेक्निकल अधिकारी ॲस्टिट विकास आहिरे या अधिकार्याची टीम ही निकवेल येथे पोहचली. यावेळी उपस्थित ग्रामस्थ शिवाजी सोनवणे, पंचायत समिती सदस्य भास्कर बच्छाव, अभिमन सोनवणे, मन्साराम सोनवणे, मुरलीधर वाघ, कंडू वाघ, चिंतामण वाघ, नानाजी वाघ, उत्तम वाघ, भिका वाघ यांना भेटून केटीवेअरची जागा कुठे आहे. तेथे पोहचताच अधिकार्यांनी दहिंदुले गावाशेजारील पुलाच्या खालच्या भ्
निकवेल : आरम नदीवर केटीवेअर बंधारा व्हावा म्हणून लोक प्रतिनिधींनी लक्ष घालून लवकरात लवकर केटीवेअर करण्याची मागणी नदीकाठ परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. आरम नदीवर केटीवेअरचे मोजमाप अधिकारी करून घेतात आणि निघून जातात. असे बर्याच वर्षापासून सुरू आहे. त्यातच मागच्या आठवड्यात लघुसिंचन जलसंधारण उपविभागीय अभियंता राजेंद्र धूम, शाखा अभियंता पी. डी. जाधव, सचिन गुंजाळ, टेक्निकल अधिकारी ॲस्टिट विकास आहिरे या अधिकार्याची टीम ही निकवेल येथे पोहचली. यावेळी उपस्थित ग्रामस्थ शिवाजी सोनवणे, पंचायत समिती सदस्य भास्कर बच्छाव, अभिमन सोनवणे, मन्साराम सोनवणे, मुरलीधर वाघ, कंडू वाघ, चिंतामण वाघ, नानाजी वाघ, उत्तम वाघ, भिका वाघ यांना भेटून केटीवेअरची जागा कुठे आहे. तेथे पोहचताच अधिकार्यांनी दहिंदुले गावाशेजारील पुलाच्या खालच्या भागामध्ये केटीवेअरचे मोजमाप केले, असे बर्याच वर्षापासून सुरू आहे. अधिकारी येतात मोजमाप करून निघून जातात; मात्र केटीवेअरचे बांधण्याचे दिवस अजून उजाडत नाही. त्यामुळे उपस्थित ग्रामस्थांनी लघु सिंचन जलसंधारण उपविभागीय अभियंता राजेंद्र धूम यांच्यासह सर्वच अधिकार्यांना खडे बोल सुनावले. त्यावर केटीवेअर बांधण्यासंबंधी निधी उपलब्ध नसल्या कारणाने केटीवेअरचे काम होत नसल्याचे अभियंता राजेंद्र धूम यांनी सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांनी खासदार डॉ. सुभाष भामरे, बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण यांच्याशी संपर्क करून आरम नदीवर केटीवेअर लवकरात व्हावा, अशी मागणी केली आहे; मात्र लोकप्रतिनिधी खासदार, आमदार किती लक्ष घालून काम करतात येणारा काळच ठरवेल. आरम नदीवर केटीवेअर झाल्यास निकवेल, जोरण, उंधणा, विंचुरे, दहिंदुले आदि गावांचा पाणी प्रश्न सुटू शकतो.कोटदहिंदुले गावाशेजारी आरम नदीवर केटीवेअर बंधार्याचे मोजमाप करून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तो शासनापर्यंत पोहोचवण्यात येईल, शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यास, तत्काळ केटीवेअरचे काम सुरू करण्यात येईल.राजेंद्र धूम, उपविभागीय अभियंता, लघुसिंचन जलसंधारण उपविभाग सटाणाआरम नदीवर केटीवेअर बंधारा व्हावा यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे; मात्र अद्याप शासनाने बंधार्यासाठी निधी मंजूर न केल्याने अद्याप बंधार्याचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार, दीपिका चव्हाण यांनी लक्ष घालावे.शेतकरी, अभिमन सोनवणे