वक्फ बोर्डाविरोधात हजारो चर्च एकवटले; केरळमध्ये घडला अनोखा प्रकार, गावकरी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 12:26 PM2024-11-11T12:26:11+5:302024-11-11T12:27:17+5:30

देशात वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यातच केरळमधील हा प्रकार समोर आला आहे. 

Catholic Church in Kerala vs Waqf Board Issue: Syro-Malabar Church rallies support for Munambam residents protesting Waqf land claims | वक्फ बोर्डाविरोधात हजारो चर्च एकवटले; केरळमध्ये घडला अनोखा प्रकार, गावकरी संतप्त

वक्फ बोर्डाविरोधात हजारो चर्च एकवटले; केरळमध्ये घडला अनोखा प्रकार, गावकरी संतप्त

कोची - वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. मुस्लीम समाज मोठ्या संख्येने या विधेयकाविरोधात आवाज उचलत आहे तर हिंदू संघटनांही विधेयकाच्या बाजूने बोलत आहेत. देशभरात या विधेयकावरून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. परंतु केरळमध्ये एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. याठिकाणी वक्फ बोर्डाच्या मनमानी कारभाराविरोधात एक हजार चर्चने मोर्चा उघडला आहे. 

माहितीनुसार, केरळमधील या चर्चच्या लोकांनी आरोप लावला आहे की, वक्फ बोर्ड मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करत आहे. चर्चचा हा विरोध कोचीतील मुनंबम आणि चेराई गावातील जमीन वादावर आहे. वास्तविक, केरळच्या कोची जिल्ह्यात मुनंबम आणि चेराई नावाची दोन गावे आहेत. या गावातील गावकऱ्यांच्या जमीन आणि मालमत्तेवर वक्फ बोर्डाने बेकायदेशीर कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी वक्फ बोर्डाविरोधात मोर्चा उघडला आहे.

गेल्या अनेक वर्षापासून या गावात  ख्रिश्चन कुटुंबे राहत आहेत. दीर्घ काळ ते त्यांच्या मालमत्तेवर सरकारी करही भरत आहेत. त्यांच्याकडे याबाबत कागदपत्रे आहेत. मात्र आता या जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे. जमिनीची नोंदणी स्थानिक गावकऱ्यांच्या नावे आहे मग त्यावर वक्फ बोर्ड दावा कसं करू शकते असा सवाल या गावकऱ्यांनी केला आहे. या मुद्द्यांवरून सध्या चांगलेच राजकारण पेटले आहे. केरळमध्ये ज्या जमिनीवर वक्फ बोर्ड दावा करत आहे त्यावर कित्येक पिढ्या ख्रिश्चन कुटुंब राहत आहेत.

उपोषणाचं हत्यार, लोकांचा वाढता विरोध

वक्फ बोर्डाने केलेल्या दाव्यामुळे हा विषय इतका चिघळला आहे की, ख्रिश्चन कुटुंबाच्या अनेकांनी याविरोधात उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. ठिकठिकाणी लोकांचा विरोध वाढत आहे.  जर हा मुद्दा निकाली काढला नाही तर आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिरो मालाबार चर्चचे मुख्य मेजर आर्कबिशप राफेल थाटिल यांनी केंद्र आणि राज्य सरकारला मुनंबम प्रकरणी हस्तक्षेप करून तोडगा काढण्याची मागणी केली आहे. वक्फ बोर्डाच्या दाव्याविरोधात रविवारी जे विरोध प्रदर्शन झाले त्याचे नेतृत्व सिरो मालाबार चर्चने केले. 
 

Web Title: Catholic Church in Kerala vs Waqf Board Issue: Syro-Malabar Church rallies support for Munambam residents protesting Waqf land claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.