- ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 7 - शेतक-यांची अनेक ठिकाणी आंदोलन सुरु असताना तामिळनाडूसाठी कावेरी नदीतून पाणी सोडण्यात आले. कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तामिळनाडूसाठी सकाळी पाणी सोडण्यास सुरुवात केली. पुढील 10 दिवस दररोज 15 हजार क्युसेक्स पाणी तामिळनाडूसाठी सोडण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तामिळनाडूमधील शेतक-यांची परिस्थिती सुधारण्यासाठी पुढील 10 दिवस कावेरी नदीतून पाणी रोज 15 हजार क्युसेक्स पाणी सोडण्याचे आदेश दिले होते.
कावेरी नदीचं पाणी तामिळनाडूला सोडण्याच्या निर्णयावरुन कर्नाटकमध्ये संघर्ष पेटला आहे. मंगळवारी शेतकरी आणि काही संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि अनेक ठिकाणी जाळपोळ केली. बंगळुरु - म्हैसूर हायवेवरील वाहतूकही ठप्प झाली होता. आंदोलनानंतरही सरकारने मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत तामिळनाडूसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता.
Farmers in Mandya (Karnataka) protest against release of Cauvery water to Tamil Nadu. pic.twitter.com/Or26lP62CC— ANI (@ANI_news) September 7, 2016
मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांची केंद्रीय मंत्री आणि आमदारांसोबत तब्बल तीन तास बैठक चालली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना 'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करु शकत नाही. न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत जड मनाने आम्ही तामिळनाडूसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं.' सिद्धरमय्या बोलले होते.
Mandya (6/9/2016): Karnataka begins release of Cauvery water to Tamil Nadu; farmers hold protest against the release pic.twitter.com/qpgodpVfbO— ANI (@ANI_news) September 7, 2016