शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

मुंबईतल्या ज्वेलर्सला अटक करण्याची धमकी; लाच घेताना ईडीच्या बड्या अधिकाऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 5:13 PM

सीबीआयने लाच घेणाऱ्या ईडीच्या बड्या अधिकाऱ्याला दिल्लीत रंगेहाथ पकडलं आहे. 

Crime News : देशभरातली अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कारवायांमुळे घोटाळेबाजांचे धाबे दणाणलेले असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने ईडीच्या बड्या अधिकाऱ्याला अटक केली आहे. सीबीआने यईडीच्या सहाय्यक संचालकाला मुंबईतील एका ज्वेलर्सकडून २० लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली. ईडी अधिकाऱ्यावर झालेल्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी पीटीआला यासंदर्भात माहिती दिली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने ३ आणि ३ ऑगस्ट रोजी मुंबईतील एका ज्वेलर्सच्या दुकानाची झडती घेतली होती. त्यानंतर ईडीचे सहाय्यक संचालक संदीप सिंग यादव यांनी ज्वेलर्सच्या मुलाला २५ लाख रुपये दिले नाहीस तर अटक करु अशी धमकी दिली होती. ज्वेलरच्या मुलाने जास्त पैसे मागत असल्याचे सांगत ही रक्कम २० लाखांवर आणली. त्यानंतर संदीप सिंग यादवला लाच घेताना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडलं.

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, संदीप सिंग यादवने  यापूर्वी सेंट्रल बोर्ड बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसमध्ये काम केले होते. त्यानंतर गेल्या वर्षी मे महिन्यात ईडीमध्ये सहाय्यक संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. यादवला गुरुवारी दिल्लीतील लाजपत नगर भागातून अटक करण्यात आली. सीबीआयला तक्रार प्राप्त झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी ईडीच्या अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना  रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला होता.

"मुंबईत ईडीने छापा टाकला होता आणि आरोपी व्यावसायिकाला अडकवण्याच्या धमकीवरून लाच घेण्याचा प्रयत्न करत होता. तक्रारीच्या आधारे, एफआयआर नोंदवण्यात आला आणि सापळा रचून अटक करण्यात आली," अशी माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, आठ महिन्यांपूर्वीदेखील ईडीच्या मदुराई सब-झोनल ऑफिसमध्ये तैनात असलेल्या अधिकाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आली होती. डिसेंबर २०२३ मध्ये, तामिळनाडू दक्षता आणि लाचलुचपत प्रतिबंधक संचालनालयाने  ईडी अधिकारी अंकित तिवारी याला एकूण ५१ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेपैकी २० लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडलं होतं. तसेच गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अशाच एका प्रकरणात राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ईडी अधिकारी नवलकिशोर मीणाला त्याच्या वतीने काम करणाऱ्या एका मध्यस्थाला रंगेहाथ पकडल्यानंतर अटक केली होती.

टॅग्स :MumbaiमुंबईEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCBIगुन्हा अन्वेषण विभागdelhiदिल्लीBribe Caseलाच प्रकरण