नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया प्रकरणात देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांना नाट्यमय घडामोडींनंतर बुधवारी रात्री अटक करण्यात आली. एकेकाळी गृहमंत्री म्हणून जी संस्था चिदंबरम यांच्या आदेशान्वये काम करत असे, त्याच संस्थेने त्यांना अटक केली. इतकेच नव्हे तर दिल्लीतील सीबीआयच्या ज्या कार्यालयाचे उदघाटन चिदंबरम यांनी केले होते, त्याच कार्यालयात त्यांना बुधवारी रात्री आरोपी म्हणून आणण्यात आले. तसेच त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. 30 जून 2011 रोजी यूपीए सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळादरम्यान सीबीआयच्या नव्या कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले होते. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. तर गृहमंत्री पी. चिदंबरम यांना खास पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. दरम्यान, आता बरोब्बर आठ वर्षांनंतर त्याच सीबीआय कार्यालयात चिदंबरम यांना आरोपी म्हणून आणण्यात आले. तसेच याच कार्यालयातील कोठडीत त्यांना रात्र काढावी लागली.
गृहमंत्री म्हणून ज्या कार्यालयाचे उदघाटन केले, तिथेच सीबीआयने चिदंबरम यांना आरोपी म्हणून आणले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 10:13 AM
आयएनएक्स मीडिया प्रकरणात देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांना नाट्यमय घडामोडींनंतर बुधवारी रात्री अटक करण्यात आली होती.
ठळक मुद्देआयएनएक्स मीडिया प्रकरणात देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांना नाट्यमय घडामोडींनंतर बुधवारी रात्री अटक दिल्लीतील सीबीआयच्या ज्या कार्यालयाचे उदघाटन चिदंबरम यांनी केले होते, त्याच कार्यालयात त्यांना बुधवारी रात्री आरोपी म्हणून आणण्यात आले