CBI Busts Racket: राज्यसभेची उमेदवारी आणि राज्यपालपद मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन 100 कोटी रुपयांची फसवणूक करणार्या आंतरराज्य टोळीचा केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तपास यंत्रणेने अनेक ठिकाणी छापे टाकून टोळीतील चार जणांना अटक केली आहे. एक आरोपी सीबीआय अधिकाऱ्यांवर हल्ला करून पळून जाण्यात यशस्वी झाला. तपास संस्थेच्या अधिकार्यांवर हल्ला केल्याप्रकरणी फरार आरोपींविरुद्ध स्थानिक पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
एफआयआरमध्ये काय आहे?एफआयआरनुसार, राज्यसभेत जागा मिळवून देणे, राज्यपालपदी नियुक्ती करणे, केंद्र सरकारच्या मंत्रालयांतर्गत विविध सरकारी संस्थांचे अध्यक्षपद मिळवून देणे, अशी खोटी आश्वासन देऊन ही टोळी सामान्य लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळायची. 100 कोटी रुपयांच्या बदल्यात राज्यसभेची उमेदवारी मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देऊन लोकांची फसवणूक करण्यात आली.