नवी दिल्ली : सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या सीबीआय प्रमुख पदावरून हटविल्याच्या निर्णयाला स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पुन्हा रुजू होण्यास सांगितले होते. बुधवारी त्यांनी पदभारही स्वीकारला होता. मात्र, आज त्यांची गच्छंती करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी नियुक्ती समितीची बैठक निवासस्थानी बोलावली होती. या समितीमध्ये तीन सदस्य असतात. यामध्ये सीक्री आणि काँग्रेसचे सभागृह नेते मल्लिकार्जुन खरगे हे देखिल उपस्थित होते. यामध्ये खरगे यांनी वर्मा यांच्या गच्छंतीला विरोध केला. मात्र, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये 2-1 मतांनी आलोक वर्मा यांच्या उचलबांगडीवर शिक्कामोर्तब झाले. वर्मा यांना होमगार्ड, नागरी सुरक्षा आणि अग्निशमन सेवा यावर महासंचालक बनविण्यात आले आहे.
आजच सायंकाळी आलोक वर्मा यांनी सीबीआयच्या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची पुन्हा जुन्या पदावर बदली केली होती. सह संचालक अजय भटनागर, डीआयजी एम के सिन्हा, तरुण गौबा, मुरमगेसन आणि अतिरिक्त संचालक ए. के. शर्मा यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.