शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

भ्रष्टाचार खटल्यांत ‘सीबीआय’ ठरली यशाएवढीच अपयशीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 3:52 AM

नवी दिल्ली : भ्रष्टाचारमुक्तीचा नारा देऊन नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या चार वर्षांत केंद्राच्या अखत्यारित असलेल्या केंद्रीय गुप्तचर संस्थेला (सीबीआय) भ्रष्टाचार खटल्यांमध्ये जवळजवळ समान यश व अपयश आल्याचे दिसते.

नवी दिल्ली : भ्रष्टाचारमुक्तीचा नारा देऊन नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या चार वर्षांत केंद्राच्या अखत्यारित असलेल्या केंद्रीय गुप्तचर संस्थेला (सीबीआय) भ्रष्टाचार खटल्यांमध्ये जवळजवळ समान यश व अपयश आल्याचे दिसते. केंद्रीय कर्मचाºयांविरुद्धचे खटले फक्त ‘सीबीआय’ हाताळत असते, हे लक्षात घेण्यासारखे आहे.केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी बुधवारी लोकसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिलेल्या माहितीनुसार गेल्या चार वर्षांत ‘सीबीआय’ने दाखल केलेल्या भ्रष्टाचार खटल्यांमध्ये ३,६१७ आरोपींना न्यायालयांनी दोषी ठरवून शिक्षा दिल्या. तर ३,२०० आरोपींना सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केले गेले. मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोषसिद्धीचा वार्षिक आकडेवारी अशी: वर्ष २०१४- ५०९ खटल्यांत ९९३ आरोपी दोषी. सन २०१५- ४३४ खटल्यांत ८७८ दोषी. वर्ष २०१६ मध्ये ५०३ खटल्यांत १,००५ आरोपी दोषी व यंदा नोव्हेंबर अखेरपर्यंत ७४१ आरोपी दोषी. सीबीआयने केलेल्या तपासात केंद्र सरकार हस्तक्षेप करत नाही.ज्यात आरोपी निर्दोष सुटतात अशा प्रकरणांच्या निकालांची छाननी करून अपिलाबाबत निर्णय घेण्याची सीबीआयची सुप्रस्थापित अशी अंतर्गत व्यवस्था आहे. त्यानुसार निर्णय घेतले जातात, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.>जबाबदारी निश्चितीआरोपी निर्दोष सुटण्यास तपासातील त्रुटी कारणीभूत आहेत की अभियोग चालविण्यातील यादृष्टीनेही निकालपत्रांचा अभ्यास केला जातो व अ‍ॅटर्नी जनरल वा त्यांच्या प्रतिनिधींच्या सल्ल्याने जबाबदारी निश्चित केली जाते, असेही मंत्र्यांनी सांगितले.>आरोप सिद्धकरण्यात अपयशवर्ष खटले२०१४ ७४८२०१५ ८२१२०१६ ९४४२०१७* ७५५(*नोव्हेंबर अखेरपर्यंत)

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग