नवी दिल्ली- सीबीआयनं दिल्लीतल्या न्यायालयानं बोफोर्स प्रकरणातील चौकशी थांबवण्याची परवानगी मागितली आहे. तशा प्रकारचा न्यायालयात त्यांनी अर्जही केला आहे. तसेच याचिकाकर्ते अजय अग्रवाल हेसुद्धा बोफोर्स प्रकरणात चौकशीसाठी केलेली याचिका परत घेऊ इच्छितात. दिल्लीतल्या न्यायालयात सीबीआयनं अर्ज परत घेण्यासाठी मंजुरी दिली आहे. या प्रकरणात आता पुढील सुनावणी 6 जुलै रोजी होणार आहे.तत्पूर्वी मुख्य मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट नवीन कश्यप यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटलं होतं की, सीबीआयला या प्रकरणातील पुढील चौकशीसाठी न्यायालयाच्या परवानगीची गरज कशाला?, याशिवाय सीबीआयनं ऑन रेकॉर्ड प्रकरणात काही कायद्यांचा उल्लेख केला आहे, ज्यात सीबीआयनं न्यायालयात बोफोर्स प्रकरणात चौकशीसाठी न्यायालयाची परवानगी दिली आहे. सीबीआयनं सांगितलं की, पुढच्या कारवाईचा निर्णय नंतर घेण्यात येईल.4 डिसेंबर 2018ला न्यायालयानं सीबीआयला विचारलं होतं की, पुढील चौकशीसाठी न्यायालयाच्या परवानगीची गरज आहे काय?, तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयानं बोफोर्स प्रकरणात हिंदुजा बंधूंना आरोपमुक्त करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी सीबीआयनं केलेली याचिका रद्द केली होती.
बोफोर्सची चौकशी होणार बंद, CBI आणि याचिककर्त्यांनी अर्ज घेतला मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 4:00 PM