शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

सीबीआय चौकशीची शिफारस

By admin | Published: July 08, 2015 2:18 AM

व्यापमं घोटाळ्याची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्याची शिफारस राज्य सरकारतर्फे मंगळवारी उच्च न्यायालयात करण्यात आली.

भोपाळ : देशभरात गाजत असलेल्या आणि अनेक गूढ मृत्यूंनी व्यापलेल्या मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्याची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्याची शिफारस राज्य सरकारतर्फे मंगळवारी उच्च न्यायालयात करण्यात आली. खोलवर पाळेमुळे पसरलेल्या या घोटाळ्यात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचेही नाव आले असून, विरोधकांकडून होत असलेल्या चौफेर टीकेपुढे अखेर त्यांना झुकावेच लागले. सीबीआय चौकशीसाठी उच्च न्यायालयाला विनंती करण्याची घोषणा स्वत: चौहान यांनीच मंगळवारी सकाळी केली. बळींची संख्या पोहोचली ५० वर> व्यापमं घोटाळ्याशी संबंधित बळींची संख्या ५० वर पोहोचली असून, गेल्या आठवडाभरात पाच जणांच्या गूढ मृत्यूमुळे जनमानस ढवळून निघाले आहे. परंतु चौहान यांचा हा निर्णय काँग्रेसला कदापि मान्य नसून, केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखालीच सीबीआय तपासाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊ शकते, असे पक्षाने स्पष्ट केले आहे. केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या मागणीला धार आली आहे.उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या दोघांप्रति माझ्या मनात आदर आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसटीएफ आणि एसआयटीमार्फत सुरू असलेल्या व्यापमं घोटाळ्याच्या चौकशीवरही माझा पूर्ण विश्वास आहे. परंतु मृत्यूंच्या निमित्ताने जे वातावरण तयार करण्यात येत आहे त्यामुळे लोकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे. लोकशाहीत जनभावना अत्यंत महत्त्वाची आहे. त्याच जनभावनेचा आदर राखून मी उच्च न्यायालयाला व्यापमं घोटाळ्याची चौकशी सीबीआयमार्फत करण्याचा आदेश देण्याची विनंती केली आहे. - शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री