शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

न्या. लोया मृत्यू : एसआयटी चौकशीची मागणी, कॉंग्रेससह 13 पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2018 8:37 PM

सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश बी. एच.लोया यांच्या चार वर्षांपूर्वी नागपूर येथे झालेल्या संश्यास्पद मृत्यूचं प्रकरण सध्या देशभरात चर्चेत आहे.

नवी दिल्ली : सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश बी. एच.लोया यांच्या चार वर्षांपूर्वी नागपूर येथे झालेल्या संश्यास्पद मृत्यूचं प्रकरण सध्या देशभरात चर्चेत आहे. न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणाची स्वतंत्रपणे चौकशी व्हावी, यासाठी सुप्रीम कोर्टाच्या नेतृत्वात विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी आज अनेक विरोधी पक्षांच्या खासदारांनी केली. कॉंग्रेससह 13 विरोधी पक्षातील नेत्यांनी शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन पत्राद्वारे ही मागणी केली. 

''हे गंभीर प्रकरण आहे, न्या. लोया यांचा मृत्यू हा संशयास्पद परिस्थितीत झाला आहे. प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिलं आहे, देशभरात या प्रकरणाची चर्चा झाली आहे. या चौकशीसाठी 15 राजकीय पक्षांच्या 114 खासदारांनी एका अर्जावर सह्या केल्या आहेत. प्रकरण गंभीर आहे, त्यामुळे आम्ही सर्वजण या प्रकरणाची स्वतंत्र चौकशीची मागणी करीत आहोत''', अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या भेटीनंतर दिली.यापूर्वी न्या. लोया मृत्यू प्रकरणाच्या सुनावणीवेळी म्हणजे दि.5 रोजी सुप्रीम कोर्टातील वातावरण सध्या प्रचंड तापले होते. न्यायमूर्तींच्या खंडपीठाने याप्रकरणात बाजू मांडणाऱ्या दोन वरिष्ठ वकिलांना फटकारले होते. न्यायालयाला मासळी बाजाराच्या पातळीला आणून ठेवू नका, अशा शब्दांत न्यायमूर्तींनी वकिलांना समज दिली होती. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.

 

टॅग्स :CBI judge B.H Loya death caseन्या. लोया मृत्यू प्रकरणSohrabuddin Sheikh encounter caseसोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरण