शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

राफेलप्रकरणी सीबीआय तपास करू शकते

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 4:52 AM

सीबीआयला तक्रारीवर कायद्यानुसार कारवाई करण्यास कोणतीच आडकाठी नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. के. एम. जोसेफ यांनी गुरुवारी नोंदविले.

नवी दिल्ली : फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या व्यवहारातील ‘ऑफसेट’ कंत्राट अनिल अंबानी यांच्या कंपनीस वशिल्याने दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा नोंदवून तपास करावा यासाठी केलेली याचिका आम्ही फेटाळली असली तरी सीबीआयला तक्रारीवर कायद्यानुसार कारवाई करण्यास कोणतीच आडकाठी नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. के. एम. जोसेफ यांनी गुरुवारी नोंदविले.माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा व अरुण शौरी आणि अ‍ॅड. प्रशांत भूषण यांच्यासह इतरांनी राफेल प्रकरणी केलेल्या चार याचिका सर्वोच्च न्यायालयाने गेल्या डिसेंबरमध्ये फेटाळल्या होत्या. त्या निकालाच्या फेरविचारासाठी केलेल्या याचिकाही न्यायालयाने आज फेटाळल्या. याचे ११ पानी मूळ निकालपत्र सरन्यायाधीश रंजन गोगोई व न्या. संजय कृष्ण कौल यांनी लिहिले. न्या. के. एम. जोसेफ या खंडपीठावरील तिसऱ्या न्यायाधीशांनी मात्र ९१ पानांचे वेगळे निकालपत्र लिहिले.त्यात त्यांनी सिन्हा, शौरी व भूषण यांची मूळ याचिका व फेरविचार याचिकाही फेटाळण्याशी सहमती दर्शविली. मात्र या निकालानंतरही ‘सीबीआय’ या तिघांनी केलेल्या फिर्यादीच्या आधारे कारवाई करू शकते, असे मत त्यांनी नोंदविले.न्या. जोसेफ यांनी लिहिले की, कायद्यातील नव्या दुरुस्तीची आम्हाला कल्पना आहे. ज्यांच्याविरुद्ध तपास करायचा त्यांचीच पूर्वसंमती घ्यायची, ही तुमची अडचणही आम्ही जाणतो. पण या अडचणीने थांबून न राहता तुम्ही संमतीसाठी तरी विनंती करावी आणि ती तीन महिन्यांत न मिळाल्यास त्यानंतर फिर्यादीवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी आमची विनंती आहे, असे या तिघांनी लिहिले होते.राफेल प्रकरणी पंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास करण्याचे मार्ग पूर्ण बंद झालेले नाहीत, असे सूचित करणारे वेगळे मत न्या.जोसेफ यांनी नोंदवावे हे लक्षणीय आहे.>काय म्हणाले न्या. जोसेफ?न्या. जोसेफ यांनी म्हटले की, आम्ही रिट अधिकारक्षेत्राच्या मर्यादेत राहून हा निकाल दिला. मात्र दखलपात्र गुन्ह्याची फिर्याद आल्यावर त्याचा तपास करण्याचे तपासी अधिकाºयाचे अधिकार आमच्याहून व्यापक असतात.गुन्हा घडल्याचे प्रथमदर्शनी दिसल्यावर त्याचा रीतसर गुन्हा नोंदवून तपास करण्यावाचून तपासी अधिकाºयास गत्यंतर नसते.भ्रष्टाचारविरोधी कायद्यात गेल्या वर्षी केलेल्या दुरुस्तीने लोकसेवकाविरुद्धच्या (पब्लिक सर्व्हंट) भ्रष्टाचाराच्या फिर्यादीचा तपास सरकारची पूर्वसंमती घेतल्याशिवाय न करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.त्यामुळे आम्ही मर्यादित अधिकारात या प्रकरणाच्या तपासाचा आदेश देण्यास नकार दिला असला तरी सीबीआयला कायदेशीर कर्तव्य पार पाडण्यास त्यामुळे आडकाठी येणार नाही.सरकारची पूर्वसंमती घेणे व ती मिळाली तर गुन्हा नोंदवून तपास करणे, हे ‘सीबीआय’ करू शकते.

टॅग्स :Rafale Dealराफेल डील