नवी दिल्ली- ममता बॅनर्जी आणि सीबीआयच्या आडून केंद्र सरकारमध्ये सुरू असलेल्या वादावरून लोकसभेतही रणकंदन झालं आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत निवेदन दिलं. राजनाथ सिंह निवेदन देत असताना तृणमूलच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. सीबीआय तोता है, तृणमूलच्या खासदारांची घोषणाबाजी देत सभागृह दणाणून सोडला. त्यादरम्यान राजनाथ सिंह यांनी भाषण दिलं आहे. कायद्याच्या संस्थांना अटकाव करणं देशहितासाठी योग्य नाही. संस्थांना काम करण्यापासून रोखल्यास व्यवस्थेचे तीन-तेरा वाजतील. केंद्रानं नेहमीच राज्यांच्या अधिकारांचा सन्मान केला आहे.पोलीस हे राज्यांतर्गत येतात. राज्यांनीही केंद्र सरकारच्या संस्थांचा सन्मान केला पाहिजे. कालची घटना ही संवैधानिक मूल्यांना पायदळी तुडवण्यासारखी आहे. राज्यपालांशी माझं बोलणं झालं असून, मी त्यांच्याकडून एक रिपोर्ट मागितला आहे. मुख्यमंत्र्यांनी सरकारी संस्थांना काम करण्यापासून रोखू नये, असंही राजनाथ सिंह म्हणाले आहेत.
''सीबीआय तोता है'', विरोधकांच्या घोषणेनंतर राजनाथ सिंह म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 1:21 PM