ऑनलाइन लोकमत लखनौ, दि. १५ - गंगा नदीत जे १०० हून अधिक मृतदेह सापडले त्याचा सीबीआयमार्फत तपास करण्यात यावा अशी मागणी उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री व बसपा सुप्रिमो मायावती यांनी केली. उत्तरप्रदेशातील उन्नाव जिल्हयातील गंगा नदीच्या किनारी गेल्या ५ दिवसात १०४ मृतदेह सापडले आहेत. उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टीचे सरकार आल्यापासून कायदा व सुरक्षा धोक्यात आली असून समाजवादी पार्टी व भाजपाचे अंतर्गत राजकीय संबंध असल्याचा आरोप मायावती यांनी पत्रकारांशी बोलताना केला. उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी यासाठी मायावती यांनी नुकतीच राज्यपाल राम नाईक यांची भेट घेतली होती. परंतू भाजप व सपा या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी समाजवादी पार्टी व भाजपाविरुध्द पूर्ण ताकदीनिशी मैदानात उरण्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच तयारी करावी असे आवाहनही मायावती यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
गंगेत सापडलेल्या 'त्या' मृतदेहांचा सीबीआय तपास करा - मायावती
By admin | Published: January 15, 2015 4:01 PM