National News : काँग्रेसचे डीके शिवकुमार यांच्या घरासह 15 ठिकाणांवर सीबीआयची 'रेड'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 10:14 AM2020-10-05T10:14:23+5:302020-10-05T10:14:52+5:30

National News : सीबीआयने डीके शिवकुमार आणि त्यांचे बंधु सुरेश यांच्याशी संबंधीत 15 ठिकाणांवर धाडी टाकल्या आहेत. त्यामध्ये, बंगळुरु येथील जुने निवास्थान डोड्डालहल्ली, कनकपुरा आणि सदाशिव नगर येथील ठिकाणांचा समावेश आहे.

CBI raids 15 places, including Congress' DK Shivkumar's house | National News : काँग्रेसचे डीके शिवकुमार यांच्या घरासह 15 ठिकाणांवर सीबीआयची 'रेड'

National News : काँग्रेसचे डीके शिवकुमार यांच्या घरासह 15 ठिकाणांवर सीबीआयची 'रेड'

googlenewsNext
ठळक मुद्देसीबीआयने डीके शिवकुमार आणि त्यांचे बंधु सुरेश यांच्याशी संबंधीत 15 ठिकाणांवर धाडी टाकल्या आहेत. त्यामध्ये, बंगळुरु येथील जुने निवास्थान डोड्डालहल्ली, कनकपुरा आणि सदाशिव नगर येथील ठिकाणांचा समावेश आहे.

बंगळुरू - कर्नाटकमधीलकाँग्रेसचे प्रमुख डीके शिवकुमार यांच्या आणि त्यांचे बंधु डीके सुरेश यांच्या घरावर सीबीआयने धाड टाकली आहे. सोमवारी सकाळी-सकाळीच सीबीआयचे अधिकारी शिवकुमार यांच्या बंगळुरूस्थित घरी पोहोचले आहेत. काँग्रेसने या सीबीआयच्या या छापेमारीचा निषेध करत, सीबीआयला भाजपाच्या हातातील बाहुली असं म्हटलं आहे. तसेच, सीबीआयच्या धाडीने आम्ही कमकुवत होणार नसल्याचंही काँग्रेसने म्हटलंय. 

सीबीआयने डीके शिवकुमार आणि त्यांचे बंधु सुरेश यांच्याशी संबंधीत 15 ठिकाणांवर धाडी टाकल्या आहेत. त्यामध्ये, बंगळुरु येथील जुने निवास्थान डोड्डालहल्ली, कनकपुरा आणि सदाशिव नगर येथील ठिकाणांचा समावेश आहे. याप्रकरणी काँग्रेसने नाराजी व्यक्त करत, मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटर करुन, मोदी आणि येदीयुरप्पा सरकारकडून काँग्रेसला भीती दाखविण्याचा प्रयत्न सीबीआयद्वारे करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. सीबीआयला येदीयुरप्पा सरकारच्या भ्रष्टाचाराचा तपास करायला हवा, पण 'रेड राज' या कपटनितीद्वारे त्यांचं काम चालतंय, असेही सुरजेवाला यांनी म्हटलंय. 

मोदी सरकारकडून काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना घाबरविण्याचा आणि धमकविण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, या कपटनितीपुढे आम्ही झुकणार नाही, तर लोकांसाठी लढतच राहणार असल्याचा आमचा संकल्प आहे, असेही सुरजेवाला यांनी ट्विटररुन म्हटलं आहे.   

Web Title: CBI raids 15 places, including Congress' DK Shivkumar's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.