नवी दिल्ली - नौदलामध्ये बनावट बिलांच्या आधारे करण्यात आलेल्या घोटाल्याची व्याप्ती आता वाढत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयने आज दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सुमारे ३० ठिकांवर एकाच वेळी धाडी घातल्या आहेत. नौदलाच्या पश्चिम कमांडला आयटी हार्डवेअरचा पुरवठा करण्यासाठी बनावट बिल बनवून ६.७६ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप आहे.
कॅप्टन अतुल कुलकर्णी, कमांडर मंदार गोडबोले, आरपी शर्मा आमि पेटी ऑफीसर एलओजी (एफ अँड ए) कुलदीप सिंह बघेल यांनी कथितपणे ६.७६ कोटी रुपयांची सात खोटी बिले बनवली, असा आरोप आहे. दरम्यान, या प्रकरणी केलेल्या छापेमारीमध्ये पोलिसांना १० लाख रुपयांची रोकड मिळाली आहे. त्याशिवाय काही महत्त्वपूर्ण कागदपत्रेही मिळाली आहेत.
हे संपूर्ण प्रकरण नौदलाच्या पश्चिम कमांडमध्ये आयटी हार्डवेअरच्या पूर्ततेसाठी आकस्मिक जावक बिलांशी संबंधित आहे. संरक्षण मंत्रालयाने केलेल्या अंतर्गत तपासामधून या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला होता. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाने २३ ऑक्टोबर २०१९ रोजी सीबीआयने याबाबत माहिती दिली. दरम्यान, संरक्षण मंत्रालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर सीबीआयने या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.
दरम्यान, नौदलामध्ये झालेला हा घोटाळा ६.७६ कोटी रुपयांपेक्षा अधिक असू शकतो. या प्रकरणी आता तपासाने वेग घेतला असून, जुन्या विजबिलांचीसुद्धा तपासणी करण्यात येणार आहे. सध्या सीबीआय नौदलातील अधिकारीआणि कंपन्यांकडून माहिती मिळवत आहे.
आापर्यंत याप्रकरणी कॅप्टन अतुल कुलकर्णी, कमांडर मंदार गोडबोले, कमांडर आरपी शर्मा, पेटी ऑफीसर एलओजी (एफ अँड ए) कुलदीप सिंह बघेल यांच्यासोबत एस. एम. देशमाने, ए. के. विश्वास, इंदू कुंभारे, अनमोल कंदियाबुरू, प्रदीप चव्हाण, अमर देववाणी (खासगी व्यक्ती), मेसर्स एसीएमई नेटवर्क अँड आयटी सॉल्युशन (कंपनी), कौशल पंचाल सायबरस्पेस इंफोव्हिजन, प्रायव्हेट लिमिटेडचे मालक, जितू मेहरा (मेसर्स मोक्ष इन्फोसिस कंपनीचे मालक) आणि मेसर्स स्टार नेटवर्क कंपनीचे मालक लालचंद यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल