नवी दिल्ली : ऑनलाईन चाइल्ड पोर्नाग्राफी प्रकरणी सीबीआयने आज (शनिवारी) २० राज्यात ५६ ठिकाणी छापेमारी केली आहे. या ऑपरेशनला सीबीआयने मेघदूत असं नाव दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी देशात अनेक टोळ्या सक्रीय आहेत. जे मुलांना फिजिकली ब्लॅकमेल करुन त्यांचा वापर करत आहेत. या टोळ्या दोन पद्धतीने काम करत आहेत, एक समुह तर दुसरीकडे व्यक्तीगत पद्धतीने काम करत असल्याचे समोर आले आहे.
वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉमवर याचे व्हिडिओ शेअर केलेल्या संबंधीत व्यक्तींचे न्यूझीलंड इंटरपोलद्वारे सिंगापूरला माहिती शेअर केली होती. सिंगापूरने या संदर्भात भारताला माहिती दिली होती. यानंतर सीबीआयने ही कारवाई केली.
सीबीआयने यासारखेच २०२१ मध्ये ऑपरेशन राबवले होते. या ऑपरेशनला 'ऑपरेशन कार्बन' असं नाव दिले होते. यावेळी ७६ ठिकाणी छापा टाकून ८३ जणांवर गुन्हा दाखल केला होता.
सीबीआयची इंटरपोल नोडल एजन्सी आहे. या एजन्सीकडे बाल लैगिंक शोषण प्रकरणी फोटो, व्हिडिओज आहेत.भारतासह ६४ देशांद्वारे वापरल्या जाणार्या आयसीएसईने जगभरातील १०,७५२ गुन्हेगारांना ओळखण्यात आणि डेटाबेसमधील २३ लाख फोटो आणि व्हिडिओंसह २३,५०० मुलांना त्यांच्या तावडीतून सोडवण्यात मदत केली आहे.
सुप्रीम कोर्टाने सोशल मीडिया कंपन्यांना बाल पोर्नोग्राफी व्हिडिओ अपलोड करण्याविरोधात पावले उचलली आहेत.फेसबुक, ट्विटरसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कंपन्यांना ६ आठवड्यात अनुपालन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.