नवी दिल्ली : शस्त्र परवाना प्रकरणात सीबीआयने सोमवारी जम्मू-काश्मीर आणि नवी दिल्लीत १३ ठिकाणी धाडी टाकल्या. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जम्मू- काश्मीरचे रूपांतर केंद्र शासित प्रदेशात झाल्यानंतरची सीबीआयची ही पहिली मोठी मोहीम आहे.जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर सीबीआयला दिल्ली विशेष पोलीस स्थापना कायद्यानुसार तेथे काम करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आयएएस अधिकारी यश मुदगिल आणि राजीव रंजन व माजी वरिष्ठ अधिकाºयांच्या निवासस्थानांची झडती घेतली जात आहे. श्रीनगर, जम्मू, गुडगाव आणि नोएडामध्ये जवळपास १३ ठिकाणांवर धाडी टाकल्या जात आहेत.एटीएसचे असे मत होते की, दहशतवादाने पीडित जम्मू- काश्मिरात विविध जिल्ह्यांत गत दशकात जवळपास ४.२९ लाख शस्त्रांचे परवाने जारी करण्यात आले. बारामुलाचे तत्कालीन उपायुक्त मुदगिल, कुपवाडाचे तत्कालीन उपायुक्त राजीव रंजन, कुपवाडाचे तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी इतरत हुसैन, किश्तवाडचे तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी सलीम मोहम्मद आदी अधिकाºयांच्या ठिकाणांची झडती घेतली जात आहे.काय आहे प्रकरण?जम्मू- काश्मीरच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांत दोन लाख शस्त्रे जारी करण्यात कथित अनियमिततेप्रकरणी सीबीआयने कुपवाडा, बारामुला, उधमपूर, किश्तवाड, शोपिया, राजौरी, डोडा, पुलवामाचे तत्कालीन उपायुक्त यांच्या ठिकाणांची झडती घेतली. असा आरोप आहे की, तत्कालीन सरकारी अधिकाºयांनी जम्मू- काश्मीरच्या अनिवासी लोकांना नियमांचे उल्लंघन करून परवाने जारी केले.
काश्मीर, दिल्लीत सीबीआयच्या धाडी; १३ ठिकाणी छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 2:07 AM