पाटना : रेल्वे हॉटेल टेंडर प्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानावर सीबीआयने मंगळवारी छापा टाकला. यावेळी राबडी देवी यांच्यासह त्यांचा मुलगा आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची सुद्धा सीबीआयने जवळपास चार तास चौकशी केली. रेल्वे हॉटेल टेंडर प्रकरणी गेल्या वर्षी जुलै महिन्यात पहिल्यांदाच सीबीआयने लालू प्रसाद यादव यांच्या घरी छापेमारी केली होती. त्यानंतर आता पाटनामधील 10 सर्कुलर रोडवरील राबडी देवींच्या घरावर सीबीआयने छापा टाकला. यावेळी त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांची सुद्धा चौकशी केली. ही चौकशी जवळपास चार तास चालली. यावेळी सीबीआयचे 12 हून अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले. दरम्यान, याप्रकरणी लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अनेक ठिकाणांवर यापूर्वीही छापेमारी करण्यात आली आहे.
IRCTC टेंडर घोटाळ्याप्रकरणी राबडी देवींच्या घरावर सीबीआयचे छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 4:58 PM