नवी दिल्ली : खाण घोटाळ्याप्रकरणी समाजवादी पार्टीचे नेते गायत्री प्रजापती यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकल्या आहे. याप्रकरणी दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील 22 ठिकाणी सीबीआयने छापेमारी केली आहे. तसेच, सीबीआयकडून अमेठीतील गायत्री प्रजापती यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी सुरु आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय खाण घोटाळ्याची चौकशी 2016 पासून करीत आहे. याप्रकरणी सीबीआयने अज्ञात आरोपींसह सरकारी अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचे सरकार असताना हा खाण घोटाळा झाला होता.
याआधी जानेवारी महिन्यात सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी लखनऊ, कानपूर, हमीरपूर, जालौन आणि दिल्लीमधील 14 ठिकाणी छापेमारी केली होती. यावेळी सीबीआयने लखनऊमधील हुसैनगंज येथील आयएएस अधिकारी बी. चंद्रकला यांच्या घरावर सुद्धा छापा टाकला होता. दरम्यान, गायत्री प्रजापती यांच्यावर बलात्काराचा आरोपही असून सध्या ते जेलमध्ये आहेत.