नवी दिल्ली: सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अबकारी घोटाळ्याप्रकरणी उद्या सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावले आहे. दरम्यान, सीबीआयला तपासात संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे सिसोदिया म्हणाले. तसेच, अरविंद केजरीवालांनी सिसोदियांना शहीद भगत सिंग यांची उपमा दिली. याआधी, अंमलबजावणी संचालनालयाने उत्पादन शुल्क धोरणातील कथित घोटाळ्यासंदर्भात शुक्रवारी दिल्लीत 25 ठिकाणी छापे टा
मनीष सिसोदिया काय म्हणाले?सीबीआय कारवाईच्या पार्श्वभूमीवर सिसोदियांनी ट्विट केले की, 'माझ्या घरावर 14 तास सीबीआयने छापे टाकले, काहीही निष्पन्न झाले नाही. माझ्या बँक लॉकरची झडती घेतली, त्यातही काहीही निष्पन्न झाले नाही. माझ्या गावात यांना काही सापडले नाही. आता यांनी उद्या सकाळी 11 वाजता मला मुख्यालयात बोलावले आहे. मी जाईन आणि तपासात पूर्ण सहकार्य करेन.'कले होते.
अरविंद केजरीवालांचे ट्विट
काय आहे वाद?उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी दिल्लीतील नवीन उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. त्याचबरोबर 11 उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. तेव्हापासून हे मद्य धोरण सीबीआयच्या चौकशीत आहे.
सिसोदियांच्या घरावर छापा 19 ऑगस्ट रोजी सीबीआयने नवीन उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेसाठी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकला होता. यानंतर ईडीनेही या प्रकरणाची फाइल सीबीआयकडून घेतली. या प्रकरणी सीबीआयने 15 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.