CBI Vs CBI : राकेश अस्थाना न्यायालयाला शरण; मोठी कारवाई न करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 02:44 PM2018-10-23T14:44:24+5:302018-10-23T15:03:31+5:30
सीबीआयने मांस व्यापारी मोईन कुरेशी प्रकरणी आपलाच अधिकारी डीएसपी देवेंद्र कुमार याला काल अटक केली होती. कुमार याला आज पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले
नवी दिल्ली : सीबीआयने मांस व्यापारी मोईन कुरेशी प्रकरणी आपलाच अधिकारी डीएसपी देवेंद्र कुमार यांना काल अटक केली होती. कुमार यांना आज पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सीबीआयने कुमार यांची 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. तर कुमार यांच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज केला आहे.
Rakesh Asthana also moved petition in Delhi High Court seeking quashing of the CBI's FIR against him and that no coercive steps be taken against him. pic.twitter.com/oiJsUtWzzF
— ANI (@ANI) October 23, 2018
या दरम्यान, सीबीआयचे नंबर दोनचे अधिकारी राकेश अस्थाना यांनीही न्यायालयात शरणागती पत्करली असून दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी आपल्याविरोधात दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यासह कोणतीही मोठी कारवाई न करण्याची मागणी केली आहे.
अस्थाना यांनी कुरेशी प्रकरणात चौकशी करत असलेल्या आरोपीकडून 2 कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सीबीआयने स्वत:च्याच मुख्यालयात छापे टाकले होते. यावेळी देवेंद्र कुमारकडून 8 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. देवेंद्र यांच्या घरावरही रविवारी छापा टाकण्यात आला होता.
CBI seeks 10 days remand of CBI Dy SP Devender Kumar. Devender Kumar's lawyer has moved bail plea in Delhi's Patiala House Court.
— ANI (@ANI) October 23, 2018
आरोपी सना याने अस्थाना यांनी 2 कोटी रुपयांची लाच घेतल्याची माहिती चौकशीवेळी दिली होती. यानंतर कुमार याने हा जबाब फिरवून त्याचा दिल्लीत जबाब नोंदवल्याचे म्हटले होते. मात्र, सना या दिवशी हैदराबादला होता.
सीबीआयने 16 ऑक्टोबरला दुबईहून परतणारा दलाल मनोज प्रसाद याला ताब्यात घेतले होते.