CBI Vs CBI Live : राहुल गांधी यांना अटक; पोलिसांनी काँग्रेसच्या 25 कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 10:32 AM2018-10-26T10:32:15+5:302018-10-26T14:52:00+5:30

सीबीआयमधील दोन अधिकाऱ्यांचा वाद आणि लाचखोर अधिकाऱ्यावरील कारवाईमुळे देशातील वातावरण तापले आहे.

CBI Vs CBI Live: What will happen to Alok Verma? Hearing today; Congress movements | CBI Vs CBI Live : राहुल गांधी यांना अटक; पोलिसांनी काँग्रेसच्या 25 कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

CBI Vs CBI Live : राहुल गांधी यांना अटक; पोलिसांनी काँग्रेसच्या 25 कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

googlenewsNext

नवी दिल्ली : सीबीआयमधील दोन अधिकाऱ्यांचा वाद आणि लाचखोर अधिकाऱ्यावरील कारवाईमुळे देशातील वातावरण तापले आहे. यातच पंतप्रधान मोदी यांनी राफेल घोटाळ्याची चौकशी थांबविण्यासाठी सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांची हकालपट्टी केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच या विरोधात आलोक वर्मा हे सर्वोच्च न्यायालयात गेल्याने यावर आज सुनावणी होणार आहे. काँग्रेसचे आंदोलन आणि न्यायालयीन घडामोडी मोठ्या प्रमाणावर घडणार आहेत...

राहुल गांधी लोधी रोड पोलिस ठाण्यात दाखल; काँग्रेसच्या 25 कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

दिल्लीतील काँग्रेसचे आंदोलन



 

काँग्रेसकडे जनतेच्या विकासाचा कोणताच मुद्दा नसल्याने निरर्थक विषयांवर आंदोलने करत आहे. आम्ही सीव्हीसीच्या अहवालाची वाट पाहत आहोत. : राजनाथ सिंग



 

लखनऊमध्ये उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर यांना ताब्यात घेतले. चंदीगढमध्ये आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केला पाण्याचा मारा



 

राहुल गांधी यांचा मोर्चा पोलिसांनी रोखला; सीबीआय मुख्यालयासमोर मोठा बंदोबस्त 



 

सीबीआय मुख्यालयासमोर आंदोलन करण्यासाठी दयाल सिंग कॉलेजसमोरून मोर्चा निघाला;  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सहभागी



 

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना आंदोलनावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले.

सीबीआयच्या मुंबई, लखनऊमधील कार्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन सुरु



 

नवे सीबीआय संचालक एम नागेश्वर राव यांच्यावर बंधने; पुढील सुनावणीपर्यंत कोणतेही धोरणात्मक निर्णय नकोत : न्यायमूर्ती रंजन गोगोई



 

राकेश अस्थाना यांच्या केंद्र सरकारविरोधातील याचिकेवर सीव्हीसी आणि केंद्र सरकारला नोटीस; 12 नोव्हेंबरला सुनावणी



 

हंगामी सीबीआय संचालक धोरणात्मक निर्णय घेऊ शकणार नाहीत. आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांची चौकशी दहा दिवसांत पूर्ण करावी. चौकशी निवृत्त न्यायाधीश किंवा सध्याच्या न्यायाधीशांच्या निरिक्षणाखाली व्हावी : सर्वोच्च न्यायालय



 

 

आलोक वर्मा यांच्या याचिकेवरील सुनावणीला सुरुवात; नियमांचं पालन न करता पदभार काढून घेतल्याचा आरोप.



 

सीबीआयचे  विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी केंद्र सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविल्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

बिहारमध्येही सीबीआयच्या कार्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन सुरु.



 

बेंगळुरुमध्ये सीबीआयच्या कार्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन सुरु. काळे मुखवटे घालून मोदी सरकारचा निषेध



 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सीबीआय मुख्यालयासमोर आंदोलन करण्यासाठी काँग्रेसचे सर्व नेते दयाल सिंह कॉलेजच्या बाहेर जमले आहेत. जयवीर शेरगिल यांनी मोदी सरकारवर टीका करताना म्हटले की, 'राफेल से घबराई मोदी शाह की जोड़ी, इसलिए रातों रात सीबीआई तोड़ी।'

सीबीआय वादावर संचालक आलोक वर्मा यांच्या याचिकेवर थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; वर्मा यांच्या बाजुने वरिष्ठ वकील फाली एस नरीमन लढणार. सीव्हीसीकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि राकेश अस्थाना यांच्या बाजुने मुकुल रोहतगी बाजू मांडतील.

काँग्रेसच्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर सीबीआय मुख्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त



 

ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी सर्वोच्च न्यायालयात जाण्यास निघाले. राकेश अस्थाना यांच्या बाजुने करणार युक्तीवाद. हा अन्य खटल्यांसारखाच एक खटला असल्याची रोहतगी यांची प्रतिक्रिया



 

सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी आज सकाळी वरिष्ठ वकिल मुकुल रोहतगी यांची भेट घेतली.


 

सीबीआय मुख्यालयाबाहेर काँग्रेसच्या आंदोलनामध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार नदीम उल हक ही सहभागी होणार; राहुल गांधी नेतृत्व करणार



 

Web Title: CBI Vs CBI Live: What will happen to Alok Verma? Hearing today; Congress movements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.