शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
2
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
3
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
4
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
5
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
6
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
7
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
8
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
9
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
10
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर
11
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
12
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
13
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
14
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
15
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
16
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
17
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
18
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
19
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
20
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार

CBI Vs CBI : हंगामी संचालकांवर निर्बंध; चौकशी 10 दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 12:06 PM

दोन्ही अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली.

नवी दिल्ली : सीबीआयमधील दोन अधिकाऱ्यांचा वादावर आणि केंद्र सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी हंगामी सीबीआय संचालक एम नागेश्वर राव यांच्यावर निर्बंध लादत आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांची चौकशी दोन आठवड्यांत पूर्ण करण्याचे आदेश सीव्हीसीला दिले आहेत. 

सीबीआयमधील दोन अधिकाऱ्यांचा वाद आणि लाचखोर अधिकाऱ्यावरील कारवाईमुळे देशातील वातावरण तापले आहे. काँग्रेसने सीबीआय मुख्यालयासमोर आंदोलन सुरु केले असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सहभागी झाले आहेत. 

या प्रकरणावर दोन्ही अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती गोगोई यांनी चौकशीचे आदेश दिले. यावर सीव्हीसीच्या वकिलांनी 10 दिवस अपुरे असून तीन आठवड्यांचा कालावधी देण्याची मागणी केली होती. 

न्यायमूर्ती गोगोई यांनी सांगितले की, 10 दिवसांत चौकशी पूर्ण करावी. चौकशी निवृत्त न्यायाधीश किंवा सध्याच्या न्यायाधीशांच्या निरीक्षणाखाली व्हावी. तसेच हंगामी सीबीआय संचालक एम नागेश्वर राव यांच्यावर पुढील सुनावणीपर्यंत कोणतेही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. 

सीबीआयचे  विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी केंद्र सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविल्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने सीव्हीसी आणि केंद्र सरकारला नोटीस दिली असून यावर 12 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. 

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारRanjan Gogoiरंजन गोगोई